agriculture news in marathi, status of labours working on employment guarantee scheme, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यात मनरेगाच्या कामांवर ८६४४ मजूर कार्यरत
टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 जून 2018

नगर : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सुरू असलेल्या विविध कामांवर ८६४४ मजूर काम करत आहेत. सध्या चौदा तालुक्‍यांत १६६३ कामे सुरू असल्याचा ग्रामपंचायत विभागाचा अहवाल आहे. याशिवाय सुमारे ३६ हजार ४० कामे मजुरांनी मागणी केल्यानंतर लगेच सुरू करण्याच्या स्थितीमधील असल्याचे रोहयो विभागातून सांगण्यात आले.

नगर : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सुरू असलेल्या विविध कामांवर ८६४४ मजूर काम करत आहेत. सध्या चौदा तालुक्‍यांत १६६३ कामे सुरू असल्याचा ग्रामपंचायत विभागाचा अहवाल आहे. याशिवाय सुमारे ३६ हजार ४० कामे मजुरांनी मागणी केल्यानंतर लगेच सुरू करण्याच्या स्थितीमधील असल्याचे रोहयो विभागातून सांगण्यात आले.

मजुरांना रोजगार मिळावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गावपातळीवर वैयक्‍तिक व सार्वजनिक कामे केली जातात. ग्रामपंचायतीत ग्रामसभेच्या मंजुरीनंतर वार्षिक आराखडा मंजूर केला जातो. त्यानंतर मजुरांनी केलेल्या मागणीनुसार कामे केली जातात.

सध्या जिल्ह्यामधील १४ तालुक्‍यांत १६६३ कामे सुरू असून, त्या कामांवर ८६४४ मजूर काम करत आहेत. त्यात ग्रामपंचायतीमार्फत १२०७ कामे सुरू असून, तेथे ५४१८ मजूर, तर यंत्रणांची ४५६ कामे सुरू असून, त्यावर ३२२६ मजूर काम करत आहेत. ग्रामपंचायतीची सध्या सुमारे २२ हजार ६१९, यंत्रणेची १३ हजार ४२१ कामे सेल्फवर असून, मजुरांनी मागणी केली की ती लगेच सुरू करता येतील अशी स्थिती आहे. सेल्फवरील कामांची पावणेपंचेचाळीस लाख मजूरक्षमता आहे, असे जिल्हा परिषदेच्या रोहयो विभागातून सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...