agriculture news in marathi, status of sericulture, satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवड
टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

सातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने दरवर्षी तुतीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ७९५ शेतकऱ्यांनी ७७३ एकरांवर तुतीची लागवड केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक तुती लागवड सातारा तालुक्यात झाली असल्याची माहिती रेशीम कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

सातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने दरवर्षी तुतीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ७९५ शेतकऱ्यांनी ७७३ एकरांवर तुतीची लागवड केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक तुती लागवड सातारा तालुक्यात झाली असल्याची माहिती रेशीम कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

शेतीला पूरक उद्योग या दृष्टिकोनातून रेशीम शेती फायदेशीर ठरू लागली आहे. शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल वाढावा, यासाठी शासनाने महात्मा गांधी हमी योजनेअंतर्गत रेशीम शेती योजना कार्यान्वित केली होती. या योजनेस शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सप्टेंबरअखेर सर्व योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ७९५ शेतकऱ्यांनी ७७३ एकरांवर तुतीची लागवड केली आहे.

कऱ्हाड, सातारा, वाई, खंडाळा, फलटण, कोरेगाव, माण व खटाव या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचा यात समावेश आहे. २०१२-१३ मधील दुष्काळामुळे तुतीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना नाईलास्तव तुती काढून टाकावी लागली होती. त्यानंतर झालेल्या जलसंधारणाच्या कामांतून पाण्याची उपलब्धता होऊ लागल्याने वाई येथील रेशीम कार्यालयाने फायदेशीर रेशीम शेतीचा प्रसार आणि प्रचारावर भर दिला. यातून रेशीम शेती करण्याकडे तरुण शेतकऱ्यांचा कल वाढला. कर्नाटकातील रामनगर येथील बाजारपेठेत अपेक्षित दर मिळाल्याने जिल्ह्यातील तुती क्षेत्रात वाढ होत गेली.

माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या दुष्काळी तालुक्यांसह सातारा व कऱ्हाड तालुक्य़ातील शेतकरी रेशीम शेती करीत आहेत. जिल्हयात सर्वाधिक तुती लागवड सातारा तालुक्यातील १७६ शेतकऱ्यांनी १७५ एकर क्षेत्रावर केली आहे.  

 

तालुका निहाय तुतीचे लागवड क्षेत्र
तालुका शेतकरी क्षेत्र (एकर)
कऱ्हाड १०३ ९९
सातारा १७६ १७५
वाई ५७ ५४
खंडाळा ३२ ३२
खटाव ५३ ४५
माण १३४ १३१.५०
फलटण ११० १११.५०
कोरेगाव १३० १२५

 

इतर ताज्या घडामोडी
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...
सहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...
मराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...
पणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे  ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...
पुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...
खानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव  ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...
शकूबाईंच्या लढ्याला आले यश;  वनजमीन...वणी, जि. नाशिक  : शेतकरी व आदिवासींच्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद  ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
उन्नत शेती अभियानात १५ दिवसांत १९ लाख...मुंबई : राज्यात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी...
पाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा...अमरावती  ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी...
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी...मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने...
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत...मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना...