पुणे विभागातील ८५ गावे, ३१२ वाड्यांमध्ये पाणीटंचाई

पाणीटंचाई
पाणीटंचाई

पुणे  : पूर्वमोसमी पावसाने दणक्‍यात हजेरी लावली असली तरी विभागातील पुणे, सातारा जिल्ह्यांत तीव्र पाणीटंचाई आहे. पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातील २० तालुक्‍यांमधील ८५ गावे ३१२ वाड्यांच्या टंचाईग्रस्त भागाची तहान भागविण्यासाठी ७५ टॅंकर सुरू करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. पाऊस सुरू झाला असला तरी पाणीटंचाई दूर होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्‍यकता आहे.

विभागात यंदा सातारा जिल्ह्याला टंचाईच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. साताऱ्यातील खटाव, माण, कोरेगाव, पाटण, महाबळेश्‍वर, खंडाळा तालुक्‍यांसह ११ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील ५१ गावे, १८१ वाड्यांमधील सुमारे ६० हजार लोकसंख्या आणि १२ हजार जनावरांना पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, भोरसह नऊ तालुक्‍यांतील २९ गावे १८१ वाड्यांना २९ टॅंकर, तर सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्‍यातील ५ गावे एका वाडीला तीन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोल्हापूरच्या दुर्गम भागात पाणीपुरवठा करण्यासाठी दोन स्त्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत.

विभागात गतवर्षी जूनच्या सुरवातीला पाणीटंचाईची तीव्रता खूपच अधिक होती. विभागात ४११ गावे आणि २५०५ वाड्यांना ३८७ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. सांगलीतील १७६ गावे १३१२ गावांना १८० टॅंकरने, साताऱ्यातील १७० गावे ६५१ वाड्यांना १२९ टॅंकरने, पुणे जिल्ह्यातील ६३ गावे ५३६ वाड्यांना ७६ टॅंकरने तर सोलापूरातील २ गावे ३ वाड्यांना २ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता, असे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले. जलयुक्त शिवार योजनेतील कामांमुळे यंदा भूजल पातळी चांगली असून, धरणांमध्येही चांगला पाणीसाठा असल्याने पाणीटंचाई तुलनेने खूपच कमी आहे.  

विभागातील पाणीटंचाईची स्थिती
जिल्हा गावे वाड्या लोकसंख्या पशुधन टॅंकर
पुणे २९ १८१ ५४७८२ २९
सातारा ५१ १२८ ५९०५५ ११८०९ ४३
सांगली ६७८२
कोल्हापूर ६७१ २९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com