agriculture news in marathi, Stop the milk collection at various places in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंद
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 जुलै 2018

औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत दूध संकलन बंद झाले. उत्पादकांनी दूध न घालून तर संकलन करणाऱ्यांनी आपली केंद्रे बंद ठेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा येथील दूध उत्पादकांनी सोमवारी (ता. १६) ग्रामदैवत हनुमंताला दुग्धाभिषेक करून गावातील दूध संकलन बंद ठेवत दूध दराविषयीच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला.

औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत दूध संकलन बंद झाले. उत्पादकांनी दूध न घालून तर संकलन करणाऱ्यांनी आपली केंद्रे बंद ठेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा येथील दूध उत्पादकांनी सोमवारी (ता. १६) ग्रामदैवत हनुमंताला दुग्धाभिषेक करून गावातील दूध संकलन बंद ठेवत दूध दराविषयीच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला.

या वेळी दुधाला मागणीनुसार दर मिळण्याविषयी घोषणाबाजीही करण्यात आली. लाखगंगा गावासोबतच परिसरातील बापतारा पुरणगाव, डोणगाव, बाभूळगाव गंगा, सावखेड गंगा, हिंगोणी आदी गावांतही दूध संकलन बंद ठेवण्यात आले. त्यामुळे जवळपास १६ ते १७ हजार लिटर दूध संकलनाला ब्रेक लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी सकाळच्या दूध संकलनात जवळपास चाळीस हजार लिटर दूध संकलनाला ब्रेक लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जिल्हा दूध संघाच्या संकलनात मात्र केवळ पैठण व कन्नड तालुक्‍यांतील जवळपास सहा हजारांची घट वगळता फारसा फरक पडला नसल्याचे दूध संघाकडून सांगण्यात आले. बीड जिल्ह्यातील आष्टी, गेवराई व बीड तालुक्‍यांतील दूध संकलनात जवळपास दोन लाख लिटरची घट आल्याचे सूत्रांनी सांगितले. मिळणारा दर खर्चाला परवडत नसल्याने आंदोलनाला पाठिंबा देत दूध संकलनाकडे पाठ फिरविल्याचे बीड तालुक्‍यातील उत्पादकांनी सांगितले.

मुक्‍या प्राण्यांना पाजले दूध
औरंगाबाद जिल्ह्यातील भिवधानोरा येथील दूध संकलन केंद्रावरील संकलन सोमवारी (ता. १६) बंद करून सर्व शेतकरी बांधवांनी भोलेनाथाला दुग्ध अभिषेक करण्यात आला. दुध फेकून देण्याऐवजी मुक्‍या प्राण्यांना कुत्रे, मांजरांना दूध पाजून अनोखे आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी तालुका अध्यक्ष संपत रोडगे, भाऊसाहेब शेळके उपजिल्हा प्रमुख प्रहार शेतकरी संघटना औरंगाबाद, दादासाहेब चव्हाण, दत्तात्रेय शिंदे, बाळासाहेब दुबे, शंकर चव्हाण, शांमद भाई, राजेंद्र चव्हाण, बाळासाहेब गाडेकर व भिवधानोरा परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
दूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना...सोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची...
शेतकऱ्यांनो, संघटित होऊन संघर्ष करा :...आळेफाटा, जि. पुणे : ‘‘शेतकऱ्यांवर प्रत्येक...
पंतप्रधानांकडून केरळसाठी 500 कोटींची...तिरुअनंतपुरम : केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि...
परभणीत फ्लॉवर प्रतिक्विंटल १००० ते १२००...परभणी  ः  येथील जुना मोंढा भागातील फळे-...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पाऊसपुणे  : जिल्ह्यात गुरुवारी (ता. १६) सर्वदूर...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील ८१...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
शेतीमालावरील निर्यातबंदी हटवा;...सांगली : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत...
अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीननवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
पुणे विभागात आडसाली ऊसाची ५१ हजार ६८०...पुणे  : जून, जुलै महिन्यांत पडलेल्या...
साताऱ्यात ‘जलयुक्त’मधून सोळा हजारांवर...सातारा  : जिल्ह्यात जलयुक्त शिवार...
वऱ्हाडात पावसाचे दमदार पुनरागमनअकोला  : मागील २० दिवसांपासून पावसाचा खंड...
जोरदार पावसामुळे दाणादाण; यवतमाळ...यवतमाळ  ः जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या...
ग्लायफोसेटवरील बंदीने शेतीवर संकट ओढवेल...पाउलो, ब्राझील ः कॅलिफोर्निया न्यायालयाने...
रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिकारांगडा हंगामात कांदा पिकापासून अधिक उत्पन्न...
डिजिटल साधनांचा निळा प्रकाश डोळ्यांसाठी...सध्या मोबाईल, लॅपटॉपसह डिजिटल साधनांचा वापर...
उत्तर, मध्य महाराष्ट्र, विदर्भ,...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होत आहेत....
मोठ्या आकाराचे जपानी मुळे हृदयरोग...गाजरे, कांदा आणि ब्रोकोली या भाज्यांसोबतच...
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...