Agriculture news in Marathi, Stop misleading farmers on loan waiver, said Punjab Chief Minister Amarinder Singh | Agrowon

कर्जमाफीवरून पंजाबमध्ये अारोप-प्रत्यारोपांच्या फैरी
वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

चंडीगड, पंजाब ः पंजाबमध्ये शेतकरी कर्जमाफीवरून अारोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू अाहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारने शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली अाहे. कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मान्यताही दिली अाहे. मात्र, अद्याप कर्जमाफी योजनेची अधिसूचना जारी झालेली नाही. त्यापूर्वीच शेतकरी संघटनांनी कर्जमाफी मुद्द्यावरून सरकारला घेरले अाहे.

चंडीगड, पंजाब ः पंजाबमध्ये शेतकरी कर्जमाफीवरून अारोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू अाहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सरकारने शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली अाहे. कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मान्यताही दिली अाहे. मात्र, अद्याप कर्जमाफी योजनेची अधिसूचना जारी झालेली नाही. त्यापूर्वीच शेतकरी संघटनांनी कर्जमाफी मुद्द्यावरून सरकारला घेरले अाहे.

कर्जमाफी योजनेचा काही थोड्याच शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे सांगत अनेक शेतकरी संघटनांनी सरकारवर अारोप केले अाहेत. या मुद्द्यावरून शेतकरी संघटनांनी राज्यात ठिकठिकाणी अांदोलने सुरू केली अाहे. या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकरी संघटनांचे अारोप फेटाळून लावले अाहे.

कर्जमाफीवरून शेतकरी संघटना शेतकऱ्यांची दिशाभूल करत असून, ते चुकीचे वक्तव्य करून सरकारची बदनामी करत असल्याचे मुख्यमंत्री सिंग यांनी म्हटले अाहे. शेतकरी संघटनांचे अारोप हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा त्यांनी प्रत्यारोप केला अाहे.

राज्यात ठिकठिकाणी होत असलेल्या शेतकरी संघटनांच्या अांदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिंग यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली अाहे. शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर याबाबतची अधिसूचना लवकरच जारी केली जाईल. या योजनेचा लाभ राज्यातील १३ लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार अाहे. राज्यातील कर्जदारांमध्ये ८० टक्के शेतकरी अाहेत. कर्जमाफीचा सर्वाधिक लाभ छोट्या अाणि सीमांत शेतकऱ्यांना होणार अाहे,  अशी माहिती श्री. सिंग यांनी दिली अाहे.

राज्य सरकारची अार्थिक स्थिती बिकट अाहे. तरीही पंजाब सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची रक्कम ही उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र अाणि कर्नाटक अादी राज्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीपेक्षा अधिक अाहे, असा दावा त्यांनी केला अाहे.

राजस्थान, कर्नाटक सरकारने प्रत्येकी पन्नास हजारपर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, पंजाब सरकार पाच एकरपर्यंतच्या शेतकऱ्यांचे दोन लाखांचे कर्ज माफ करणार अाहे. राज्य सरकारने कर्जदार शेतकऱ्यांची यादी तयार केली अाहे. पहिल्या टप्प्यातील कर्जमाफी संदर्भातील लवकरच अाधिसूचना जारी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘अात्महत्येचा मार्ग स्वीकारू नका’

गेल्या काही दिवसांत पंजाबमध्ये शेतकरी अात्महत्यांचे प्रमाण वाढले अाहे. या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांनी अात्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारू नये. काही दिवसांत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल अाणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे अावाहन केले अाहे.

कर्जमाफीच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटना शेतकऱ्यांची दिशाभूल करत अाहेत. ते चुकीचे वक्तव्य करून सरकारची बदनामी करत अाहेत. राज्य सरकारची अार्थिक स्थिती बिकट अाहे. तरीही पंजाब सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची रक्कम ही उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र अाणि कर्नाटक अादी राज्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीपेक्षा अधिक अाहे.

- कॅप्टन अमरिंदर सिंग, मुख्यमंत्री, पंजाब

इतर ताज्या घडामोडी
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...
रणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...