agriculture news in marathi, stop the payment of Employees' who has don Malpractices in the road works | Agrowon

रस्त्याच्या कामातील गैरव्यवहारप्रकरणी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

रो हयो कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई अपेक्षित होती; पण वेतनवाढ बंद करण्याची तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई केल्याने आपले समाधान झाले नाही. आता मी न्यायालयात दाद मागणार आहे.
- धनाजी गावडे, तक्रारदार, सावळेश्‍वर

सोलापूर : सावळेश्‍वर (ता. मोहोळ) येथे रोजगार हमी योजनेतून करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात गैरव्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दोन वेतनवाढी बंद करून शिस्तभंगाच्या कारवाईचा निर्णय त्रिसदस्यीय समितीने दिला; परंतु समितीच्या निर्णयाबाबत समाधान न झाल्याने तक्रारदार धनाजी गावडे आता न्यायालयात धाव घेणार आहेत.
‘ॲग्रोवन'मध्ये गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणी पाठपुरावा करण्यात येत आहे. या संपूर्ण कामांमध्ये कोणत्या प्रकारे गैरव्यवहार झाला आणि कसा? यासंबंधी सविस्तर वृत्तमालिकाही प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर या कामाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. या समितीने या कर्मचाऱ्यांवर कामामध्ये अनियमिततेचा शेरा मारला आहे.
 
समितीच्या अहवालावरच प्रशासनाने या प्रकरणाशी संबंधित कर्मचाऱ्यांवर ही कारवाई केली आहे. या प्रकरणी श्रीमती एस. एच. कांबळे (तत्कालीन ग्रामसेवक), मिलिंद तांबिले (तत्कालीन ग्रामसेवक), एम. पी. कांबळे (कनिष्ठ सहायक), एस. व्ही. पाटील (सहायक लेखाधिकारी), अस्लम शेख (पॅनल तांत्रिक अधिकारी), श्रीमती पल्लवी व्हटाणे (सहायक कार्यक्रम अधिकारी), एम. आर. साळुंखे (सहायक गटविकास अधिकारी), बी. एन. साबळे (ग्रामरोजगार सेवक) यांच्यावर तात्पुरत्या दोन वेतनवाढी बंद करण्याची कारवाई झाली आहे.  
 
 

इतर बातम्या
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
उत्तर महाराष्ट्रात टंचाईच्या झळा तीव्रनाशिक : भूजल पातळीत वेगाने घट होत असल्याने उत्तर...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
‘वसाका`च्या गळीत हंगामास प्रारंभकळवण, जि. नाशिक : विठेवाडी येथील वसंतदादा पाटील...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
शेतीप्रश्नांसाठी तरुणांच्या चळवळीची गरज...वैराग, जि. सोलापूर : ‘‘शेतीचे प्रश्न वाढतायेत, ते...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...