शेतकरीप्रश्‍नी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा काटशिवरी फाटा येथे रास्ता रोको

शेतकरीप्रश्‍नी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा काटशिवरी फाटा येथे रास्ता रोको
शेतकरीप्रश्‍नी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा काटशिवरी फाटा येथे रास्ता रोको

टाकळी राजेराय, जि. औरंगाबाद ः सध्या असलेल्या दुष्काळी परिस्थितीत भूलथापा देणाऱ्या सरकारने आता तरी जागे व्हावे व शेतकऱ्यांना मदत करावी आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे काटशिवरी फाटा (ता. खुलताबाद) येथे सोमवारी (ता. १०) जिल्हा उपाध्यक्ष विलास चव्हाण, तालुका अध्यक्ष शंकर अधाने, युवक तालुका अध्यक्ष आदिनाथ साळुंके यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

दुष्काळाची स्थिती भीषण होत चालली आहे. हातचा गेलेला खरीप शिवाय येण्याची शाश्वती नसलेल्या रब्बीमुळे शेतकरी हतबल आहे. अल्प पावसामुळे रानावनासह शेतातही चारा उत्पादित झाला नाही. त्यामुळे जनावरे सांभाळणे अवघड झाले आहे. परंतू सरकार मात्र याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे आत्तापर्यंतच्या कारभारावरून दिसत आहे.

शासनाने शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर काळजीने व तात्काळ निर्णय घेत प्रति हेक्‍टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे, चारा छावण्या सुरू कराव्यात; अन्यथा दावणीला चारा द्यावा किंवा त्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे द्यावे, राष्टीयीकृत बॅंका, नागरी बॅंका, अर्बन बॅंका, पतसंस्था, खासगी फाइनान्स, श्रीराम फाइनान्स, महिंद्रा फाइनान्स, शुभम फाइनान्स आदींकडून शेतकऱ्यांकडील वसुली त्वरीत थांबवावी, यासाठी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यास शासन आणि संबंधित कंपनी जबाबदार राहील. संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी रोजना लाभार्थींचे पगार लवकरच सुरू करावेत, उत्पन्न मर्यादेची जाचक अट शिथिल करावी, तसेच सातवा वेतन आयोग दिल्यास शेतकऱ्यांच्या मालाला दुप्पट भाव देण्यात यावा, आदी मुख्य मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला.

यानंतर मागण्यांसदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या वेळी गंगापूर खुलताबाद विधानसभा अध्यक्ष महेश उबाळे, अनिल चव्हाण, मिठू महालकर, भगवान कामठे, युवक तालुका उपाध्यक्ष शारेख पटेल, भाउसाहेब वाकळे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष फिरोज पठाण, जाविद पटेल, निसार पठाण, दिनेश सावजी, शैलेश तुपे, सचिन अधाने, कांताराम अघाडे, बद्रीनाथ वाकडे रमेश करपे, अनिस मामू, मजहर पटेल आदींसह शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून स्वतः पोलिस निरीक्षक हरीश खेडकर, सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com