जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (ज्वारी) आवक सुरू झाली असून, मागील आठवड्यात
बातम्या
अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा विस्कळित झाली असून, याविरुद्ध आता शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे. प्रामुख्याने खांबोरा ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या गावातील ही समस्या दूर करण्यासाठी शिवसेनेने मंगळवारी (ता. २२) चार तास रास्ता रोको केले. तूर्त हे आंदोलन मागे घेतले, तरी तातडीने उपाययोजना न केल्यास अधिक तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

खांबाेरा ६४ खेडी पाणीपुरवठा याेजनेअंतर्गत येणाऱ्या गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शिवसेनेने प्रशासनाला इशारा दिला होता. त्यानुसार योग्य ती पावले न उचलल्याने येथील अकोट मार्गावर उगवा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन झाले. आदोलनाची दखल घेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता किशाेर ढवळे यांनी १५ दिवसांच्या आत दाेन दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियाेजन करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्याने आदाेलन तूर्त मागे घेण्यात आले. प्रशासनाने आता हा शब्द न पाळल्यास थेट पाणीपुरवठ्याच्या कार्यालयातच उग्र अांदाेलन करण्याचा इशारा आदाेलकांनी दिला.
काटेपूर्णा या प्रकल्पात ४८ टक्के पाणीसाठा आहे. मागणीच्या तुलनेत पुरेसा साठा असतानाही या याेजनेअंतर्गत येणाऱ्या गावांना पुरेशे पाणी दिले जात नाही. सर्व गावांना १ दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा, जून महिन्यांपर्यंत कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती व्हावी, नंतर नियमित कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात यावे, काटेपूर्णा धरण ते उन्नई बंधारा (खांबाेरा) पर्यंतचे जलवाहिनी टाकण्याचे काम बंद त्वरित सुरू करावे, गळती, दुरुस्तीसाठी पाणीटंचाई आराखड्याअंतर्गत निधी करून काम करण्यात यावे, शासनाने दुरुस्तीसाठी दरवर्षी निधी मंजूर करावा, उगवा गावालाही याच याेजनेतून पाणीपुरवठा करण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या.
आदाेलनात माजी आमदार संजय गावंडे, गजानन दाळू गुुरुजी, श्रीरंग पिंजरकर, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, निरीक्षक अजित पाटणे, निवासी उपजिल्हाप्रमुख गाेपाल दातकर, यांच्यासह इतर सहभागी झाले.
- 1 of 566
- ››