परभणीतील लघू तलावांमध्ये २७ टक्के पाणीसाठा
माणिक रासवे
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017
परभणी : यंदाच्या पावसाळ्यात रविवारपर्यंत (ता. १) जिल्ह्यातील २२ तलावांमध्ये २७ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. अद्याप ७ तलांवातील पाणीसाठा जोत्याखालीच आहे.गेल्या आठवडाभरात पाऊस न झाल्यामुळे अनेक तलावांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे.
 
परभणी : यंदाच्या पावसाळ्यात रविवारपर्यंत (ता. १) जिल्ह्यातील २२ तलावांमध्ये २७ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. अद्याप ७ तलांवातील पाणीसाठा जोत्याखालीच आहे.गेल्या आठवडाभरात पाऊस न झाल्यामुळे अनेक तलावांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे.
 
दरम्यान, रविवारी (ता. १) सकाळी जायकवाडी धरणामध्ये २१७० दलघमी (१०० टक्के), माजलगांवमध्ये २२५.१० दलघमी (७२.१५ टक्के), येलदरी धरणात ९५.३८० (११.७८ टक्के), सिद्धेश्वरमध्ये ४४.०७ दलघमी (५४.४२ टक्के), निम्न दुधना प्रकल्पात १८४.०७ दलघमी (७५.९९ टक्के), करपरा मध्यम प्रकल्पात १५.६६८ दलघमी (६३ टक्के), मासोळी मध्यम प्रकल्पात ४.१२२ दलघमी (१५ टक्के), गोदावरी नदीवरील ढालेगाव, मुद्दगल उच्चपातळी बंधाऱ्यात १००, डिग्रस बंधाऱ्यात ६२.५६, मुळी बंधाऱ्यात ५०.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
 
गतवर्षी सप्टेंबरअखेर येलदरी धरणांमध्ये १६.७७, सिद्धेश्वरमध्ये ५४.७८, निम्न दुधनात ९६.२२, करपरा आणि मासोळी मध्यम प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. २२ पैकी १२ लघू तलावांमध्ये १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला होता.
 
यंदा अद्यापपर्यंत नखातवाडी, टाकळवाडी, कोद्री, तांदूळवाडी, चिंचोली, आडगाव, दहेगाव या सात तलावांतील पाणीसाठा अद्याप जोत्याखालीच आहे. पेडगाव तलावाध्ये ४२, आंबेगावमध्ये ३३, झरीमध्ये ९९, राणी सावरगावमध्ये ३४, पिंपळदरीमध्ये २६, देवगावमध्ये २८, जोगावाडामध्ये १०, बेलखेडामध्ये ४, वडाळीमध्ये १२, चारठाणामध्ये ४५, केहाळमध्ये ९, भोसीमध्ये ८, कवडामध्ये ३९, मांडवीमध्ये ५८, पाडाळीमध्ये ९५ उपयुक्त पाणीसाठा आहे.

इतर ताज्या घडामोडी
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...
परभणीत प्रतिक्विंटल टोमॅटो १२०० ते १८००...परभणी ः येथील कृषी उत्पन्न बाजार...
आयुर्वेदिक रेसिपींच्या आस्वादासाठी...पुणे ः आयुर्वेदात उल्लेख असलेल्या...
परभणी जिल्ह्यात कृषी विभागातील ३१ टक्के...परभणी ः परभणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी...
वाटाणा लागवड कधी करावी?वाटाणा लागवडीसाठी मध्यम ते भारी, चांगल्या...
नागपूर ३६.४ अंशांवरपुणे : राज्यातील काही भागांत कमाल तापमानात वाढ...
कोल्हापुरात भाजीपाल्याचे दर वधारलेकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
जळगावात उडदाची आवक घटलीजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्यात...
नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटलीनाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या...
उत्पादकता घटल्याने फूल मार्केटमध्ये...नागपूर : परतीच्या पावसाचा फटका बसल्याने या वर्षी...
मंचर बाजार समितीत कटतीद्वारे लूटपुणे : पालेभाज्यांसाठी आणि विशेषतः काेथिंबीरीसाठी...
नांदेड विभागात ३३ कारखान्यांच्या...परभणी : नांदेड विभागातील ५ जिल्ह्यांतील ३३ साखर...
समृद्धी महामार्गाच्या विरोधाची धार...घोटी, जि. नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
तापमान पुन्हा वाढू लागलेपुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांशी...
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पाटण, जि. सातारा ः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात...
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...