वादळी पावसामुळे नांदुरा तालुक्यात पिकांचे नुकसान

वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान

नांदुरा (बुलडाणा) : काल संध्याकाळी नांदुरा तालुक्यातील अनेक गावांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे कपाशी पीक पूर्णतः झोपले असून इतर पिकानाही त्याचा फटका बसला आहे. अशा प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला असून उत्पन्न वाढीच्या त्याच्या आशा धुळीस मिळाल्या आहे.

नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्याचे मुख्य पीक कपाशी आहे. कॉटन बेल्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या या भागात मका व सोयाबीन पिकासोबत इतरही पिके थोड्याफार प्रमाणात घेतली जातात. काल (ता. २० रोजी) संध्याकाळी या तालुक्यातील अनेक गावांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरवात झाली असताना वारा जास्त असल्याने कपाशी व मका पीक पूर्णतः जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे ऐन बोंड अवस्थेत असलेल्या कपाशी पिकाला त्याचा फार मोठा फटका बसला आहे.

सध्या मान्सूनच्या आधी पेरलेल्या कपाशीचा कापूस निघण्याची प्रक्रिया सुरू असून हा कापुसही या पावसामुळे भिजला आहे. मका पीकही वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाले आहे. हा पाऊस रब्बी हंगामासाठी फलदायी असला तरी खरीप पिकाला वादळी वाऱ्यामुळे नुकसानकारक ठरला आहे. ऐन पीक उत्पन्न वाढीच्या बहरात असताना झालेला हा वादळी पाऊस शेतकऱ्यांसाठी मारक ठरला आहे. यासाठी महसूल विभागाने नुकसान झालेल्या पिकाचा सर्वे करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. अशो मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com