agriculture news in Marathi, stormy meeting in agri Commissionerate regarding watershed corruption, Maharashtra | Agrowon

पाणलोट गैरव्यवहाराबाबत आयुक्तालयात वादळी बैठक
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 डिसेंबर 2017

पुणे : उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या पाणलोट घोटाळ्याच्या रखडलेल्या चौकशीचा आढावा घेण्यासाठी कृषी आयुक्तालयात वादळी बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘‘चौकशी करण्याची प्रशासनाची तयारी आहे,’’ अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. 

पुणे : उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या पाणलोट घोटाळ्याच्या रखडलेल्या चौकशीचा आढावा घेण्यासाठी कृषी आयुक्तालयात वादळी बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘‘चौकशी करण्याची प्रशासनाची तयारी आहे,’’ अशी भूमिका आयुक्तांनी घेतली आहे. 

पाणलोटातील गैरव्यवहाराबाबत शेतकरी गोविंद देशपांडे यांनी गंभीर स्वरूपाचे मुद्दे उपस्थित केले होते. त्यामुळे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्या दालनातच संबंधित शेतकरी व अधिकारी वर्गाला समोरासमोर बसवून मुद्दे उपस्थित करण्यास परवानगी दिली. ‘‘कोणतीही चौकशी प्रलंबित ठेवली जाणार नाही. उस्मानाबाद जिल्ह्यात कोणत्या मुद्द्यांवर चौकशी करायची व त्याचे स्वरूप कसे असेल याचा निर्णय घेतला जाईल,’’ असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

‘‘पाणलोट घोटाळ्यात कृषी खात्याने शासनाची दिशाभूल केली आहे. राज्यातील पाणलोट समित्यांच्या रचनेबाबत मी गंभीर आक्षेप नोंदविले. समित्यांच्या सचिवांची बेकायदेशीर नेमणूक करणे, कोरे चेक घेणे, खासगी बॅंकेत खाते काढून रकमा वळविणे, लक्षावधीच्या रकमा हडपणे, कृषी आस्थापना विभागाने दोषी अधिकाऱ्यांना पाठिशी घालणे, असे प्रकार सातत्याने झाले आहेत. या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी झाल्यास २०० कोटींचा घोटाळा उघड होऊ शकतो. पण तक्रार घेऊन एखादा शेतकरी पुढे आलाच तर अधिकारी वर्ग त्याला पद्धतशीरपणे बदनाम करून चौकशी हाणून पाडतात,’’ असेही स्पष्ट मत श्री. देशपांडे यांनी मांडले. 

पाणलोट घोटाळ्याबाबत श्री. देशपांडे यांनी संतप्त भावना मांडल्या आहेत. कृषी खात्यातील काही प्रकरणांबाबत कारवाई न करता उलट तक्रारदार शेतकऱ्यांनाच बदनाम केले जात आहे. माझ्या तक्रारीची फेकाफेक केली जात असून, मला न्याय न मिळाल्यास दिल्लीत उपोषणाला बसण्याची माझी तयारी आहे, असा इशारा या शेतकऱ्याने बैठकीत दिला. 

चूक असल्यास शिक्षा द्या
राज्यातील पाणलोट समित्यांच्या बेकायदेशीर रचनेतून शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात आहे. त्यामुळे कृषी खात्याची प्रतिमा डागाळत असून, दोषींवर कारवाई झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या नावाखाली काही अधिकारी घोटाळे करतात. काही जण पाकिटमाराचे दरोडेखोर झाले आहेत. मी घोटाळ्याचे पुरावे दिले; पण भ्रष्ट यंत्रणा एकमेकांना पाठिशी घालते आहे. जर माझे मुद्दे चुकीचे निघाल्यास मला शिक्षा द्या, अशी संतप्त भावना श्री. देशपांडे यांनी मांडली आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...
इतिवृत्तात शेतकरी प्रतिनिधींच्या...नांदेड : ऊसदर निश्चित करण्याच्या बाबतीत...
पंतप्रधान दौऱ्याच्या दिनी मनसे वाटणार...यवतमाळ : निवडणुकीपूर्वी अच्छे दिनचे स्वप्न...
जमीन गैरव्यवहार चौकशी 'सक्तवसुली'मार्फत... पुणे : सोलापूरच्या जुनी मिल नावाने ओळखल्या...
उन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचे...उन्हाळी भुईमुगामध्ये पीक कालावधीत सुरवातीच्या...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ६०० ते २०००...परभणीत ६०० ते १००० रुपये  परभणी...
फुलांना भेट देणाऱ्या किटकांचे डीएनए...किटकांनी फुलांना भेट दिल्यानंतर तिथे सूक्ष्म असे...
रेशीम उत्पादकांचे उपोषण अखेर सुटलेजालना : मनरेगाअंतर्गत मिळणारे पेमेंट...
जळगावात शिक्षकांची 'व्हॉट्‌सॲप'वरून...जळगाव : शाळेत वेळेवर न येणे, वेळेअगोदरच शाळा...
जळगाव जिल्ह्यात `किसान सन्मान`च्या...जळगाव  : केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर...
आरफळची ऊसबिलातून पाणीपट्टी वसूलतासगाव, जि. सांगली : दुष्काळी पार्श्वभूमीवर...
गोंदिया जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना...गोंदिया : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत...