agriculture news in marathi, straberry plantation status, satara, maharashtra | Agrowon

महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर स्ट्रॉबेरी लागवड
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

स्ट्रॉबेरीची लागवड उशीर झाल्यामुळे उत्पादनही उशिरा मिळणार आहे. डिसेंबर महिन्यात पर्यटकांना स्ट्रॅाबेरीची चव चाखता येणार आहे.
- सुनील भिलारे, स्ट्रॅाबेरी उत्पादक शेतकरी, भिलार, जि. सातारा

सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव या तालुक्‍यांत स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली आहेत. जिल्ह्यात ३२०० ते ३५०० एकरांवर स्ट्रॅाबेरी लागवड झाली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

राज्यात महाबळेश्वर तालुक्‍यात सर्वाधिक अडीच ते तीन हजार एकर तर वाई, जावली, कोरेगाव या तीन तालुक्‍यांत सुमारे एक हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. सातारा, खटाव, पाटण या तालुक्‍यांतही काही प्रमाणात स्ट्रॉबेरीची लागवड होते. स्ट्रॉबेरी लागवडीसाठी परदेशातून सुमारे १४ लाख मातृरोपे आणण्यात आली होती. या मातृरोपांद्वारे शेतात लागवडीसाठीच्या रोपांची निर्मिती बहुतांशी हरितगृहात करण्यात आली आहे. या हंगामात स्ट्रॉबेरीची मातृरोपे येण्यास काहीसा वेळ झाल्याने लागवडीसाठीची रोपे वेळेत तयार व्हायला विलंब झाला. यामुळे सुमारे एक महिना लागवड उशिरा झाली. अॅाक्टोबर माहिन्यात लागवडीस प्रारंभ झाला होता.

लागवडीच्या कालावधीत महाबळेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने काही कालावधीसाठी स्ट्रॉबेरी लागवड ठप्प झाली. पावसाने उघडीप दिल्यावर शेतात वाफसा येईल तसतशी लागवड होत राहिली. महाबळेश्वर तालुक्‍यात सर्वसाधारण अडीच हजार एकर क्षेत्रावर तर वाई, जावली, कोरेगाव या तीन तालुक्‍यांत ८०० ते एक हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या पाण्याची परिस्थिती बघता हंगामाच्या अंतिम टप्प्यात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे.

डिसेंबरमध्ये प्रमुख बहर बाजारात
उशिरा लागवड झाल्याने यंदाच्या दिवाळीत स्ट्रॉबेरी उपलब्ध झाली नाही. सप्टेंबर महिन्यात होणारी लागवड अॅाक्टोबर महिन्यात झाल्याने दिवाळी सणादरम्यान पर्यटकांकडून मिळणाऱ्या चांगल्या म्हणजेच किलोला ४०० ते ५०० रुपये दरापासून वंचित राहावे लागले आहे. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात स्ट्रॉबेरी प्रमुख बहर बाजारात येणार आहे.
 

इतर अॅग्रो विशेष
जागरूक व्यवहारासाठी माहितीचा अधिकारगाव आणि तालुका पातळीवर शेती क्षेत्राशी संबंधित जी...
पाण्यावर पहाराविहीर अथवा बोअरवेल खोदाईवर नियंत्रण, अधिक खोल...
विदर्भात उद्यापासून पावसाची शक्यता;...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेली...
मराठवाड्यात रब्बी पिकांची होरपळ सुरूऔरंगाबाद : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या रब्बी...
खानदेशातील विहिरींच्या पाणीपातळीत घटधुळे : अत्यल्प पावसामुळे खानदेशातील...
'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...
साखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावलेकोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर...
कापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...
कृषी विभागात बदल्यांसाठी 'लॉबी' झाली...पुणे : ऐन दुष्काळात नियमांची मोडतोड करून कृषी...
धुळे बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘टीडीएस...धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
दुष्काळप्रश्नी तत्काळ मदतीसाठी...नवी दिल्ली : राज्यातील दुष्काळी स्थितीवर प्रभावी...
आणखी एका कांदा उत्पादकाची...सटाणा, जि. नाशिक : कांदा दरामुळे त्रस्त...
मेंढपाळांचा ८० रुपयांत २ लाखांचा विमा...औरंगाबाद : राज्यात शेळी-मेंढी पालनावर उपजीविका...
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...