agriculture news in marathi, Strain of water for crops in Dhule district | Agrowon

धुळे जिल्ह्यातील पिकांना पाण्याचा ताण
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

धुळे : जिल्ह्यात ज्वारीचे पीक शिंदखेडा, धुळे भागांत अधिक आहे. बाजरीही या भागात आहे. सोयाबीनचे पीक शिंदखेडा व शिरपुरातील काही गावांमध्ये आहे. पाणीटंचाईसोबतच पिकांची स्थिती नाजूक बनत असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.

धुळे : जिल्ह्यात ज्वारीचे पीक शिंदखेडा, धुळे भागांत अधिक आहे. बाजरीही या भागात आहे. सोयाबीनचे पीक शिंदखेडा व शिरपुरातील काही गावांमध्ये आहे. पाणीटंचाईसोबतच पिकांची स्थिती नाजूक बनत असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.

मागील १२ दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्‍यात पाऊस झालेला नाही. पावसाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. मागील महिन्यात मूग व उडदाला पावसाचा खंड पडल्याने फटका बसला आहे. आता ज्वारी, बाजरी, सोयाबीन, कोरडवाहू कापूस पिकाचे नुकसान होत आहे. कापसाची जवळपास दोन लाख हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. एकूण चार लाख ३० हजार हेक्‍टवर खरीप पिके आहेत. यात तृणधान्याची पेरणी जवळपास एक लाख हेक्‍टवर झाली होती. प्रमुख पिकांची स्थिती नाजूक असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसेल, अशी स्थिती आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे, त्या शिरपूर व शिंदखेडा भागांतील कापूस, सोयाबीन उत्पादकांनी पिकांचे सिंचन सुरू केले आहे. काही शेतकऱ्यांनी तुषार सिंचन संच सोयाबीनमध्ये सुरू केले आहेत; परंतु कोरडवाहू सोयाबीन, कापूस उत्पादकांना पावसाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. कोरडवाहू कापूस पिकात पाते, फुले गळत आहेत. रोज सकाळपासूनच ऊन तापते. यामुळे जमिनीत किरकोळही वाफसा नाही. मुरमाड जमिनीत पिकांची स्थिती अधिकच बिकट बनत आहे.
जिल्ह्यातील कापडणे, न्याह ळोद, जापी, लामकानी, नेर आदी भागांतील शेतकऱ्यांनी कांदा पिकात सिंचन सुरू केले आहे. काही शेतकऱ्यांनी बाजरीला पट पद्धतीने पाणीही दिले आहे. जेवढा पावसाचा खंड वाढेल, तेवढी स्थिती बिकट बनेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर बातम्या
खानदेशातील प्रकल्पांतील पाणीसाठा होतोय...जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील...
केळीच्या दरात किरकोळ सुधारणाजळगाव : केळीच्या दरात मागील दोन दिवसात अल्प...
`पाण्याच्या टॅंकरला तातडीने मंजुरी द्या`सोलापूर : पाण्याबाबत तक्रारी वाढत आहेत. ग्रामीण...
पाण्याचे आर्थिक मूल्य तपासण्याची गरज ः...औरंगाबाद : निसर्गाने दिलंय आणि आपण वापरतोय अशी...
एफआरपीसाठी साखर आयुक्तालयासमोर रसवंती...पुणे ः माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील लोकनेते...
महाराष्ट्राने सिंचनासाठी अर्थसंकल्पात...औरंगाबाद  : सिंचन क्षेत्रवाढीसाठी प्रयत्न...
नांदेड जिल्ह्यात रब्बीची ११२ टक्के पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या रब्बीमध्ये १...
शेतीतील नवतंत्रज्ञान पोचवण्यासाठी...सोलापूर : "शेतकऱ्यांच्या यशोगाथा लोकांपर्यंत...
पुणे विभागात पाण्याअभावी रब्बी पिके...पुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी पेरणीच्या...
लातूर बाजारात व्यापारी, अडते संघर्ष...लातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
राज्यस्तरीय तांत्रिक समिती मूग गिळून...पुणे   : केंद्र शासनाच्या मूळ योजनेतून...
विदर्भात थंडीचा कडाका वाढला  पुणे  : उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड...
राज्य सहकारी बँकेला  १०० कोटींचे...मुंबई  : राज्य शासनाने राज्य सहकारी...
‘कृषी’ला ना पूर्णवेळ मंत्री, ना सचिवमुंबई  : राज्याच्या कृषी खात्याच्या...
`कार्यक्षम पाणी वापरात शेतकऱ्यांचे...औरंगाबाद  : नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून...
मुंबई बाजार समितीत सेवा शुल्कवसुली...मुंबई  : मुंबई बाजार समितीतील सेवा...
शिवसेना विमा कंपन्यांना जाब विचारणार ः...परभणी : मी शहरी भागातील आहे. मला पिकांमधले...
अल्पभूधारक शेतकऱ्यांचे ३८५ कोटींचे...मुंबई  : शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी...
राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...मुंबई  : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत...
राज्यातील ७४ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी...पुणे   : राज्यातील ७४ साखर कारखान्यांनी...