agriculture news in Marathi, strawberry planting delay due to rain in satara District, Maharashtra | Agrowon

साताऱ्यात स्ट्रॉबेरी लागवड लांबली
विकास जाधव
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

सातारा ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, जावली, कोरेगाव येथे परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरी लागवड लांबली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण क्षेत्राच्या सुमारे ७० टक्के लागवड झाली असून ऑक्‍टोबरअखेर लागवड सुरू राहण्याचा अंदाज आहे. पावसाच्या अगोदर लागवडी झालेल्या स्ट्रॉबेरी अतिपाण्याने मरीच्या पादुर्भावामुळे २५ टक्के क्षेत्र बाधित झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सातारा ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, जावली, कोरेगाव येथे परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरी लागवड लांबली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण क्षेत्राच्या सुमारे ७० टक्के लागवड झाली असून ऑक्‍टोबरअखेर लागवड सुरू राहण्याचा अंदाज आहे. पावसाच्या अगोदर लागवडी झालेल्या स्ट्रॉबेरी अतिपाण्याने मरीच्या पादुर्भावामुळे २५ टक्के क्षेत्र बाधित झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात सर्वाधिक सप्टेंबर महिन्यात बहुतांशी स्ट्रॉबेरी लागवडीची कामे उरकली जातात. गतवर्षी उशिरा मातृवृक्ष आल्याने स्ट्रॉबेरी लागवडीस उशीर झाल्याने स्ट्रॉबेरी बाजारात येण्यासाठी उशीर झाला होता. परिणामी गतवर्षी स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात घट झाली होती. याही वर्षी कारणे वेगळी असली तरी तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. या हंगामासाठी मातृवृक्ष वेळेत शेतकऱ्यांकडे आले असले तरी परतीचा पावसाने झोडपल्याने स्ट्रॉबेरी लागवड हंगाम लांबला आहे.

ऑक्‍टोबर महिना संपत आला तरी सुमारे ३० टक्के लागवड एकट्या महाबळेश्वर तालुक्‍यातील शिल्लक असल्याचा अंदाज आहे. सततच्या पावसामुळे शेतीजमीनीस वाफसा न आल्याने लागवडीसाठी आवश्‍यक असणारी शेतजमीन तयार झाली नाही. याचा परिणाम स्ट्रॉबेरीच्या क्षेत्राला बसण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

प्रत्येक वर्षी सरासरी साडेचार हजार एकर क्षेत्रावर लागवड होण्याची शक्‍यता असते. मात्र यामध्ये महाबळेश्वर तालुक्‍यात अडीच ते तीन हजार एकर व इतर वाई, जावली, कोरेगाव, सातारा या चार तालुक्‍यात एक ते दीड हजार एकर क्षेत्रावर लागवड होते. या हंगामात तीन ते साडेतीन हजार एकर क्षेत्रावर लागवड होण्याची शक्‍यता असल्याने असून ७०० ते एक हजार एकर क्षेत्रात घट होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

दिवाळीच्या सणात स्ट्रॉबेरी बाजारात आल्यास चांगला दर मिळतो मात्र या हंगामात उशिरा लागवड व दिवाळी सण १५ दिवस अगोदर आल्याने चांगल्या दरापासून स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना वंचित रहावे लागणार आहे. चांगल्या दरासाठी शेतकऱ्यांचे ख्रिसमस नाताळ सणावर विसंबून राहावे लागणार आहे.

स्ट्रॉबेरीचे नुकसान
जिल्ह्यात स्ट्रॉबेरीची ७० टक्के लागवडीची कामे उरकली आहेत. इतर पिकांप्रमाणे परतीच्या पावसाचा स्ट्रॉबेरी पिकासही फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे स्ट्रॉबेरीचे पीक पाण्याखाली राहिले, मोठ्या प्रमाणात मरीचा पादुर्भाव झाला आहे. यामुळे लागवड झालेल्या स्ट्रॉबेरीपैकी सुमारे २५ टक्के बाधित होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...