agriculture news in marathi, Strawberry research center project in Cabinet | Agrowon

स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राचा प्रस्ताव मान्यतेसाठी मंत्रिमंडळाकडे : मंत्री खोत
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 मे 2018

मुंबई : महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव महात्मा फुले कृषी विद्यापीठा(राहुरी)ने तयार केला असून, तो शासनाच्या मान्यतेसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवला असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. 

मुंबई : महाबळेश्वर येथे स्ट्रॉबेरी संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव महात्मा फुले कृषी विद्यापीठा(राहुरी)ने तयार केला असून, तो शासनाच्या मान्यतेसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवला असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले. 

स्ट्रॉबेरी संशोधन केंद्रामुळे दोन उच्च प्रतीच्या प्रजातींमध्ये संकर करून गोड व मोठ्या आकाराच्या फळांचे अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करता येणार आहे. नवीन वाण प्रसारित करताना रोग व कीड प्रतिबंधक राहतील याची काळजी घेतली जाणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या जातींपेक्षा घट्ट फळांच्या जाती मिळतील. स्ट्रॉबेरी फळाची साठवणूक व प्रक्रिया यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात येईल. गेल्या दोन वर्षांपासून तांत्रिक रखडलेले हे केंद्र मार्गी लावण्याचा निर्णय मंत्रालयात झालेल्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. या बैठकीला फलोत्पादन सहसंचालक जमदाडे, सातारा कृषी अधीक्षक बोरकर, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख तसेच कुलसचिव डॉ. दिलीप पवार उपस्थित होते.

स्ट्रॉबेरी लागवडीस प्रोत्साहन योजनेंतर्गत खर्चाच्या ५० टक्के किंवा ५०,००० रुपये अनुदान देण्यात येत होते. त्याच धर्तीवर २०० हेक्टर क्षेत्रावरील ही योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री खोत यांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...