agriculture news in marathi, strawberry season status, satara, maharashtra | Agrowon

महाबळेश्‍वरमधून स्ट्रॉबेरीची प्रतिदिन ७० ते ७५ टन विक्री
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 मार्च 2018

शेतकऱ्यांसाठी हा हंगाम समाधानकारक राहिला आहे. आवश्‍यक थंडीमुळे स्ट्रॉबेरीचा आकार चांगला मिळण्याबरोबरच उत्पादन आणि दर समाधानकारक आहेत.

- किसनराव भिलारे, अध्यक्ष, महाबळेश्वर सहकारी फळे, फुले व भाजीपाला खरेदी-विक्री संस्था. 
सातारा ः जिल्ह्यातील महाबळेश्वरसह अन्य तालुक्‍यांत हंगामाच्या सुरवातीपासून स्ट्रॉबेरीचे दर समाधानक राहिले आहेत. सध्या हंगामाचा पाचवा बहर सुरू झाल्याने प्रक्रियेला जाणारा स्ट्रॉबेरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या महाबळेश्वरसह अन्य तालुक्‍यांतून प्रतिदिन ७० ते ७५ टन स्ट्रॉबेरी विक्रीसाठी जात आहे. 
 
जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्‍यासह जावळी, वाई, कोरेगाव, सातारा तालुक्‍यात परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात घट झाली होती. महाबळेश्वर तालुक्‍यात सर्वधिक २५०० एकर; तर अन्य तालुक्‍यांत सुमारे एक हजार एकर अशी एकूण साडेतीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे. या हंगामात थंडीचे प्रमाण चांगले राहिल्याने कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.
 
हंगामाच्या सुरवातीस आलेली स्ट्रॉबेरी आकाराने मोठी व चवीला उत्तम असल्याने त्यास मागणी जास्त असते. 
सध्या शेतकऱ्यांना फ्रेश स्ट्रॉबेरीस ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो दर मिळत असून, दिवसाकाठी ७० ते ७५ टन स्ट्रॉबेरीची महाबळेश्वर तालुक्‍यातून विक्री केली जाते. सध्या ही स्ट्रॉबेरी मुंबई, पुणे, बेंगळूर, हैदराबाद, कोलकता, रांची, गोवा आदी मोठ्या शहरांत विक्रीसाठी जात आहे.
 
पाचवा बहर सुरू झाल्याने प्रक्रियासाठी स्ट्रॉबेरी पाठवण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या प्रक्रियेसाठी प्रतिकिलो ४० ते ३२ रुपये दर शेतकऱ्यांना मिळत आहे. उष्णतेत वाढ होऊ लागल्याने; तसेच सलग सुट्या लागून येत असल्याने पर्यटक ओढा महाबळेश्वर, पाचगणी शहराकडे वाढला आहे; तसेच शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी खरेदी करण्यासाठी व्यापारी दाखल झाले आहेत. मात्र शेतकरी पर्यटकांनाच स्ट्रॉबेरीची थेट विक्री करण्यावर भर देत आहेत. मोठे शेतकरी बॉक्‍स पॅकिंग करून स्ट्रॉबेरी पाठवत असल्यामुळे त्यांना चांगला दर मिळण्यास मदत होत आहे. 
 
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा अपवाद वगळता हा हंगाम दर व उत्पादनाबाबत समाधानकारक राहिला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हा हंगाम प्रामुख्याने एप्रिलअखेर चालण्याची शक्‍यता आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धतता आहे, अशा शेतकऱ्यांचा हंगाम मे महिन्यापर्यंत चालण्याची शक्‍यता आहे. पाणीटंचाईच्या स्थितीवर हंगामाचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

इतर अॅग्रो विशेष
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...