राष्ट्राला समृद्ध बनवण्याची ताकद सहकारात : शेखर चरेगावकर

राष्ट्राला समृद्ध बनवण्याची ताकद सहकारात : शेखर चरेगावकर,
राष्ट्राला समृद्ध बनवण्याची ताकद सहकारात : शेखर चरेगावकर,

सोलापूर : जागतिक पातळीवर सहकार चळवळीचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. या राष्ट्राला वैभवशाली बनवण्यासाठी, समृद्ध राष्ट्र करण्यासाठी सहकार चळवळीचे योगदान आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.

सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात विद्यापीठ आणि शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील स्मृती व्याख्यानमाला- २०१९ अंतर्गत व्याख्यान झाले. ‘राष्ट्रनिर्मितीमध्ये सहकाराचे योगदान‘ हा चरेगावकर यांच्या व्याख्यानाचा विषय होता. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूजच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. बी. घुटे उपस्थित होते. 

चरेगावकर म्हणाले, ‘‘राष्ट्रीय उत्पन्नावर देशाच्या आर्थिक प्रगतीची मोजमाप होते. दरडोई उत्पन्नावर हे ठरवले जाते. आता आपल्या राष्ट्राची विकसनशील देशाकडे वाटचाल सुरू आहे. यामध्ये सहकार चळवळीचा फार मोठा वाटा आहे. जागतिक स्तरावर नार्वे,  हॉलंड, स्विझर्लंड ही राष्ट्रे सहकार चळवळीच्या जोरावरच प्रगत झाली.‘‘ 

सहकार क्षेत्र फार महत्त्वाचा विषय आहे. ही चळवळ अंगीकृत केली तर देशाला पुढे जाण्यासाठी मोठी मदत होईल. श्रीमंत-गरीब यामधील विषमता दूर करण्यासाठी सहकार चळवळ निश्चितच उपयोगी ठरू शकते, असा विश्वास डॉ. फडणवीस यांनी व्यक्त केला.

विद्यार्थ्यांनो, सहकारी संस्था सुरू करा

महाविद्यालयीन काळापासून विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन सहकारी संस्था उभ्या केल्यास त्याचा भविष्यकाळात निश्चितच फायदा होतो. विद्यार्थी ग्राहक भांडार यासारख्या संस्थांची विद्यार्थ्यांनी निर्मिती करावी. यातूनच नेतृत्वाबरोबरच अनुभव मिळतो. सहकार क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत, असे चरेगावकर म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com