सांगलीत ठिकठिकाणी बंद

सांगलीत ठिकठिकाणी बंद
सांगलीत ठिकठिकाणी बंद

सांगली ः मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात ठोक मोर्चे सुरू झाले आहेत. मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आज आष्टा, इस्लामपूर, तासगाव, येडेनिपाणी, कवठेमहांकाळ येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी टायर पेटवून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला. लेंगरे (ता. खानापूर) येथे बसची तोडफोड केली. सांगलीत महापालिका क्षेत्रात मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे कोणतेही आंदोलन झाले नाही.

जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. जिल्ह्यात बंद, रास्ता रोको, निषेध फेऱ्यांमुळे वातावरण तणावाचे आहे. ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना निवेदने देऊन भूमिका मांडण्यात आली.

जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, विटा, खानापूर, येडेनिपाणी, वाघोली आदी ठिकाणी मराठा क्रांतीचे कार्यकर्ते रास्ता रोको, धरणे, निषेध फेऱ्या काढण्यात आल्या. मराठा क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ तहसीलदारांना निवेदन दिले. वाघोली येथे टायर पेटवून शासनाचा निषेध करण्यात आला. विटा, तासगाव शहर बंदला कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील वाघोली येथे टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला. कुरळप पोलिस ठाण्यांतर्गत अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त ठेवला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com