agriculture news in marathi, stromy rain alert in state today | Agrowon

राज्यात वादळी पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

पुणे : पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यात शनिवारपासून (ता. २) काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. कोकणात रविवारपासून (ता. ३) कोकणात, तर मंगळवारपासून (ता. ५) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शुक्रवारी (ता.१) दुपारनंतर पुण्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. 

पुणे : पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने राज्यात शनिवारपासून (ता. २) काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. कोकणात रविवारपासून (ता. ३) कोकणात, तर मंगळवारपासून (ता. ५) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शुक्रवारी (ता.१) दुपारनंतर पुण्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. 

मॉन्सूनने कर्नाटकपर्यंत धडक दिली असून, राज्यात ६ ते ८ जूनपर्यंत मॉन्सून येण्याची अंदाज आहे. शुक्रवारी (ता. १) दक्षिण कोकण, गोवा आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत होते. अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे. सकाळपासून वाढलेल्या उकाड्यानंतर दुपारी ढग दाटून येत असून, तुरळक ठिकाणी पाऊसही पडत आहे. गुरुवारी (ता. ३१) सांगली, नगर, परभणी, अकोला, नागपूर, वाशीम जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह वादळी पाऊस पडला.

राज्याच्या तापमानातही चढ-उतार होत असून, शुक्रवारी विदर्भातील उष्णतेची लाट निवळली होती. वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या उर्वरित भागात तापमानात घट झाल्याचे दिसून आले. मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा ३० ते ४३ अंश, कोकणात ३३ ते ३६ अंश, मराठवाड्यात ४० ते ४३ अंश तर विदर्भात ४१ ते ४५ अंशांच्या दरम्यान आहे.  

शक्रवारी (ता. १) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.८, नगर ४३.१, जळगाव ४२.६, कोल्हापूर ३५.५, महाबळेश्वर ३०.६, मालेगाव ४२.०, नाशिक ३८.५, सांगली ३७.०, सातारा ३७.६, सोलापूर ४०.०, मुंबई ३५.०, अलिबाग ३६.२, रत्नागिरी ३३.७, डहाणू ३६.१, आैरंगाबाद ४०.०, परभणी ४३.४, नांदेड ४२.५, अकोला ४३.८, अमरावती ४३.०, बुलडाणा ४१.०, चंद्रपूर ४२.३, गोंदिया ४३.२, नागपूर ४३.०, वर्धा ४४.५, यवतमाळ ४३.०. 

इतर अॅग्रो विशेष
सेंद्रिय खत व्यवस्थापनासाठी...माझ्याप्रमाणे हरितक्रांतीमध्येही पहिली १५-२०...
बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांना गावात...अकोला ः शेतकरी संघटनेच्या महिला अाघाडीचा मेेळावा...
कृषी स्वावलंबन योजनेत अल्पभूधारक शेतकरी...पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन...
सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...
राजकीयीकरणामुळे सहकाराचा ऱ्हासपुणे : देशात आठ लाखांपेक्षा अधिक सहकारी संस्था...
थंडीत चढउतार; धुळे ७ अंशांवरपुणे : मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दोन...
इराणकडून मागणी वाढल्याने सोयाबीन दरात...पुणे : राज्यात सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन...
आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेस आज...औरंगाबाद : येथे आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...
चंद्रावर कापसाला फुटले कोंब; चीनच्या...बीजिंग : चंद्राचा जो भाग पृथ्वीवरून दिसत...
प्रभावी राबवा ‘महा ॲग्रिटेक’ पीक पेरणी ते काढणीतील प्रत्येक टप्प्यावर...
पणन सुधारणेत सुसंवादाचा अभावशे तमालाचे उचित बाजारभाव देण्यासाठी पणन सुधारणा...
सावध राहा; वीज अपघात टाळावीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची...
शेतकऱ्यांची खावटी कर्जेही माफ :...मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
वाल्मीत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...औरंगाबाद : वाल्मी येथे मंगळवार (ता. १५)...
कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडणी सुुरु...कोल्हापूर ः शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन...
शेती अवजारे उद्योगाची दुर्दशा : घावटे...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना बैल व मनुष्यचलित...
ऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव पुणे  : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी...
किमान तापमानात हळूहळू वाढपुणे   ः राज्यात किमान तापमानात हळूहळू...
रोख मदतीने मिळेल शेतकऱ्यांना दिलासाशे तीला मदत करण्याची अमेरिकेची परंपरा तसी जुनीच (...
सर्वंकष धोरणाचा हवा कापसाला आधारजगातील एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या ३५ टक्के...