हुमणी रोखण्यासाठी कृती आराखडा : कृषी आयुक्तालय

हुमणी
हुमणी

पुणे : राज्यात उसाच्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात हुमणीने केलेले आक्रमण रोखण्यासाठी कृषी राज्यस्तरीय कृती आराखडा तयार केला आहे. ‘हुमणीग्रस्त उसाचे गाळप तातडीने करावे,’ असा महत्त्वपूर्ण सल्लादेखील कृषी आयुक्तालयाने साखर कारखान्यांना दिला आहे.  माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या  बैठकीत हुमणीच्या संकटाचा इशारा काही दिवसांपूर्वीच दिला होता. हा इशारा खरा ठरला असून, राज्यात सध्या ११ लाख हेक्टरपैकी मोठ्या प्रमाणात हुमणीचे आक्रमण झाले आहे, असे कृषी खात्यानेच स्पष्ट केले आहे.  ‘‘राज्यात हजारो हेक्टरपेक्षाही जास्त ऊस क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कारखानदारांनी शेतकी खात्याच्या मदतीने गावनिहाय बैठका सुरू कराव्यात,’’ अशीही सूचना श्री. पवार यांनी केली होती. हुमणीविरोधात शेतकी खात्याने म्हणजे साखर कारखान्याच्या शेतकी विभागाने की राज्य शासनाच्या कृषी खात्याने गावनिहाय बैठका घ्याव्यात, असा पेच काही कारखान्यांना पडला होता.  कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, विस्तार संचालक विजयकुमार घावटे, उपसंचालक सुभाष घाडगे यांनी मात्र एकत्रितपणे राज्यातील हुमणीग्रस्त क्षेत्राचा आढावा घेत राज्यस्तरीय कार्यशाळादेखील घेतली आहे. त्यामुळे कोणत्या विभागाने काय उपाय करायचा हे स्पष्ट करून देण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.  ‘‘साखर आयुक्तालय, कृषी आयुक्तालय, व्हीएसआय, पाडेगाव ऊस संशोधन केंद्र तसेच हुमणी तज्‍ज्ञांची आम्ही एकत्रित कार्यशाळा घेतली आहे. यात हुमणीला रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे ठरले आहे. याशिवाय रासायनिक नियंत्रणाऐवजी जैविक पद्धतीचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. तथापि, या सर्व नियोजनात साखर आयुक्तालय कितपत पुढाकार घेते यावर कृती आराखड्याचे यश अवलंबून राहील,’’ असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.  असा आहे हुमणी नियंत्रण आराखडा

  • हुमणीग्रस्त उसाचे गाळप लवकर करणे 
  • रासायनिक ऐवजी जैविक नियंत्रणावर भर
  • विविध प्रयोगशाळांमध्ये जैवनियंत्रकाचे उत्पादन घेणे
  • नियंत्रणासाठी अनुदानावर विविध साहित्यांचे वाटप करणे
  • हुमणी वेचण्यासाठी मोहिमा काढणे
  • ऊस ऊत्पादक क्षेत्रात नांगरटीची कामे दिवसा घेणे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com