अकोला जिल्ह्यात टँकरच्या पाण्याने कपाशी जगविण्याची धडपड

टँकरच्या पाण्याने कपाशी जगविण्याची धडपड
टँकरच्या पाण्याने कपाशी जगविण्याची धडपड

अकोला : पावसाने उघाड दिल्याने प्री-मॉन्सून कपाशी लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले अाहे. अाधीच पाणी समस्या असताना शेतकऱ्यांनी हिंमत करीत कपाशीची लागवड केली. पीक चांगले तरारले. जूनच्या पहिल्याच अाठवड्यात पाऊस अाल्याने सर्वत्र अानंदी अानंद होता. मात्र अाता पावसाने उघडीप घेतली अाणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरातील वातावरणच चिंतेत बुडाले अाहे.

वऱ्हाडात बुलडाणा जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, अकोला जिल्ह्यात तेल्हारा अादी तालुक्यांमध्ये प्री-मॉन्सून कपाशीची लागवड केली जाते. गेल्या हंगामात बोंड अळी अाल्याने यावर्षी २० मे पूर्वी कपाशीची लागवड होऊ नये यासाठी कृषी खात्याने बियाणे पुरवठ्यावर निर्बंध घातले होते. शिवाय जनजागृतीही केली. त्यामुळे याहंगामात कपाशीची मे अखेरीस व काही लागवड जूनच्या पहिल्या अाठवड्यात झाली अाहे. ही कपाशी सध्या दरदिवसाला वाढीच्या अवस्थेत अाहे. गेल्या अाठवड्यात झालेल्या सार्वत्रिक पावसाने सर्वत्र अानंदी वातावरण तयार झाले होते. परंतु अाता पाऊस बंद झाल्याने कपाशी लागवड केलेल्या शेतकऱ्यांना पीक वाचवण्यासाठी धडपड करावी लागते अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com