सांगली जिल्ह्यातून परदेश दौऱ्यांसाठी ४७ शेतकऱ्यांचे अर्ज

सांगली जिल्ह्यातून परदेश दौऱ्यांसाठी ४७ शेतकऱ्यांचे अर्ज

सांगली ः तीन वर्षांच्या खंडानंतर शेतकऱ्यांची परदेश सहल यंदा निघणार आहे. त्यासाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इस्राईल या तीन देशांची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातून ४७ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून, लकी ड्रॉ पद्धतीने त्यांची क्रमवारी ठरवून तो अहवाल कृषी आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे.

कोण कुठल्या विमानात बसणार हे राज्य सरकारचा कोटा निश्‍चित झाल्यानंतर ठरेल, मात्र पुन्हा एकदा शेतकरी शेतीच्या अभ्यासासाठी परदेशी दौरा करणार आहेत, हे निश्‍चित. यंदा शेतीचा अभ्यास दौऱ्यासाठी अचानकपणे त्या योजनेला सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.

यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला आहे. या दौऱ्यासाठी होणाऱ्या एकूण खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम ही राज्य शासनाकडून अनुदान म्हणून दिली जाते. निम्मी रक्कम शेतकऱ्यांना खर्च करायची असते. या दौऱ्यात अत्याधुनिक शेती तंत्राचा अभ्यास केला जातो. त्या निमित्ताने परदेश दौऱ्याची संधी मिळत असल्याने अनेक शेतकरी उत्सुक असतात.

यावर्षी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांची निवड करण्यात आली आहे. तेथील हवामान आणि शेतीतील आधुनिकीकरणाने जगभराचे लक्ष वेधलेले आहे. इस्राईलचे शेती तंत्रातील योगदान जगाला दिशा देणारे आहे. त्यामुळे या तीन देशांपैकी कुठेही संधी मिळाली तरी शेतकऱ्यांच्या हाती ज्ञानभांडार लागणार आहे. शेतकऱ्यांना उत्सुकता परदेश दौऱ्यासाठी जिल्ह्यातून अर्ज मागविण्यात आले होते. ४७ जणांनी अर्ज केले होते. त्यांची लकी ड्रॉ पद्धतीने क्रमवारी ठरविण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांच्या उपस्थितीत नुकतीच ही प्रक्रिया पार पडली. आता राज्य शासनाकडून किती जणांना संधी दिली जाते, यावर पुढील गोष्टी ठरणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com