agriculture news in marathi, Sub market to be set up at Khed Shivapur | Agrowon

खेड शिवापूर येथे उभारणार उपबाजार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

पुणे ः पुणे बाजार समितीमधील वाढलेले व्यवहार आणि पायाभूत सुविधांवर आलेल्या ताणांमुळे बाजाराचे विकेंद्रिकरण करण्यासाठी खेड शिवापूर येथे उपबाजार उभारण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे.

सुमारे ५ एकर जागेवर २५ काेटी रुपये खर्चून अत्याधुनिक सुविधांयुक्त उपबाजार विकसित करण्यात येणार आहे. शेतकरी ते ग्राहक असा हा शेतकरी बाजार असणार आहे, अशी माहिती समितीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष दिलीप खैरे यांनी दिली.

पुणे ः पुणे बाजार समितीमधील वाढलेले व्यवहार आणि पायाभूत सुविधांवर आलेल्या ताणांमुळे बाजाराचे विकेंद्रिकरण करण्यासाठी खेड शिवापूर येथे उपबाजार उभारण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे.

सुमारे ५ एकर जागेवर २५ काेटी रुपये खर्चून अत्याधुनिक सुविधांयुक्त उपबाजार विकसित करण्यात येणार आहे. शेतकरी ते ग्राहक असा हा शेतकरी बाजार असणार आहे, अशी माहिती समितीच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष दिलीप खैरे यांनी दिली.

श्री. खैरे म्हणाले, ‘‘खेड शिवापूर येथे माजी सभापती दिवंगत शिवाजीराव काेंडे यांनी पाच एकर जागा उपबाजारासाठी संपादित केली हाेती. मात्र अनेक वर्षांपासून हा बाजार आवार विकसित झाला नव्हता. पुणे बाजार समितीमधील वाढलेली आवक, व्यवहारांमुळे सध्याचे मुख्य आवार कमी पडत असून, पायाभूत सुविधांवर ताण येत आहे.

यामुळे मुख्य बाजार आवारावरील ताण कमी करण्याबराेबरच भाेर, वेल्हा, पुरंदर तालुक्यासह सांगली, सातारा, काेल्हापूर, कराड आणि कर्नाटक राज्यातील शेतमालासाठी खेड शिवापूर येथे उपबाजार विकसित करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. लवकरच उपबाजाराचा विकास आराखडा पणन संचालकांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. १२(१)च्या परवानगीनंतर कामाला तातडीने सुरवात केली जाईल.’’

उपमुख्यप्रशासक भूषण तुपे म्हणाले, ‘‘मांजरी उपबाजार आवाराच्या धर्तीवर शेतकरी बाजार खेड शिवापूर येथे विकसित करण्याचा प्रयत्न आहे. याठिकाणी शेतकरी ते ग्राहक आणि खरेदीदार असा थेट व्यवहार हाेणार आहे. या वेळी उपमुख्य प्रशासक भूषण तुपे, बाजार समितीचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे उपस्थित हाेते.

असा असेल बाजार आवार

  • एकूण क्षेत्र - पाच एकर
  • तीन मजली बाजार आवार
  • ६५० चाैरस मीटरचे तीन लिलाव गृह
  • पहिला मजला कार्यालये, चार हॉल
  • दुसरा मजला शेतकरी प्रशिक्षण केंद्र
  • ३२५ चाैरस मीटरची दाेन शीतगृहे
  • ३२५ चाैरस मीटरची दाेन गाेदामे
  • दहा आेपन प्लॉट
  • १०० टन क्षमतेचा वजन काटा

 

 

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...