agriculture news in marathi, Subash Desai was welcomed by Congress in akola | Agrowon

उद्योगमंत्री देसाईंच्या स्वागताला काँग्रेसच्या नेत्यांचीच गर्दी
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

अकोला : केंद्र व राज्यात सत्तेत सोबत राहूनही मित्र पक्ष भाजपला अडचणीत आणण्याची संधी न सोडणारे शिवसेना नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अकोला दौऱ्यात भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी चार हात लांबच राहिले. मात्र या संधीचा फायदा विरोधी पक्ष काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला आणि सुभाष देसाई यांच्या स्वागतासाठी गर्दी केली. 

अकोला : केंद्र व राज्यात सत्तेत सोबत राहूनही मित्र पक्ष भाजपला अडचणीत आणण्याची संधी न सोडणारे शिवसेना नेते तथा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अकोला दौऱ्यात भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी चार हात लांबच राहिले. मात्र या संधीचा फायदा विरोधी पक्ष काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला आणि सुभाष देसाई यांच्या स्वागतासाठी गर्दी केली. 

केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप-शिवसेनेतील तणावाचे वातावरण दिवसेंदिवस तापतच आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांविरुद्ध दंड थोपटत असल्याने, भाजप-सेनेत कलगीतुरा वाढला आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरही भाजप-सेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी एकमेकांविरुद्ध आंदोलन पुकारत परस्परांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
अकोल्यातील आरडीजी महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी गुरुवारी शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हजेरी लावली. या वेळी त्यांनी सेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

या भेटीवेळी भाजपचे आमदार, पदाधिकाऱ्यांनी जाणे टाळले. मात्र काँग्रेस नेते तथा माजी मंत्री अजहर हुसेन, महानगराध्यक्ष तथा माजी आमदार बबनराव चौधरी, रमाकांत खेतान, डॉ. अभय पाटील, यांच्यासह सेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, सहायक संपर्क प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, गोपाल दातकर, महानगरप्रमुख राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, विठ्ठल सरप, नगरसेवक शशी चोपडे, मंगेश काळे, संतोष अनासाने आदींनी स्वागत केले. 

राज्यातील सत्तेत सोबत राहूनही भाजपला अडचणीत आणण्याची संधी न सोडणाऱ्या शिवसेनेकडून भाजपवर सतत टीका सुरू असते. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दोन्ही पक्षांतील तणावावर भाष्य करण्याचे टाळत मध्यावधी निवडणुकीबाबत काही सांगू शकत नसल्याची सावध प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची कामगिरी दमदार राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इतर ताज्या घडामोडी
चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचाआरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता कोणीही नाकारत...
पूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका जळगाव  ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि...
कोकणवर अन्याय करणाऱ्यांची राखरांगोळी...नाणार  : नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार...
रणरणत्या उन्हातील धान्य महोत्सवाकडे...नागपूर  ः विदर्भाचा उन्हाळा राज्यात सर्वदूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाख टन खते उपलब्ध...पुणे : जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली...
अकोला जिल्ह्यात १०३२ शेततळ्यांची कामे... अकोला ः पीकउत्पादन वाढीसाठी शाश्वत पाणीस्रोत...
मराठवाड्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या... औरंगाबाद  : गत आठवड्याच्या तुलनेत...
परभणीत‘शेतमाल तारण योजने अंतर्गत ४०... परभणी  ः परभणी कृषी उत्पन्न बाजार...
नगर जिल्ह्यात १७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा नगर ः जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या...
परभणीत खरिपात सोयाबीन, मूग, तुरीचे... परभणी  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगरमधील २ लाख ४७ हजार शेतकऱ्यांना... नगर ः राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर...
नाशिक विभागातील ११०० गावांची "जलयुक्त... नाशिक : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी...
सार कसं सामसूम तरंग नाही तलावात...शेती कोरडवाहू. तरीही स्वबळावर दुग्ध व्यवसायातून...
बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून ‘पॉक्‍सो’ कायद्यात...
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...