agriculture news in Marathi, Subhash Desai says, farmers producers companies will get place in MIDC, Maharashtra | Agrowon

एमआयडीसीमध्ये मिळणार शेतकरी कंपन्यांना जागा : सुभाष देसाई
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

मुंबई : कृषी औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी उद्योग विभागाच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी)मध्ये शेतकरी कंपन्यांना जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या शेतकरी कंपन्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई : कृषी औद्योगिकीकरणाला चालना देण्यासाठी उद्योग विभागाच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी)मध्ये शेतकरी कंपन्यांना जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या शेतकरी कंपन्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शेतकरी उत्पादन कंपन्यांचे काम सध्या प्राथमिक स्तरावर सुरू आहे. त्याचा विस्तार करण्यासाठी तसेच सार्वजनिक, खासगी भागिदारीमधून गुंतवणूक वाढवण्याची गरज शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत व्यक्त केली. शेती उत्पादनाचे क्लस्टर तयार करणे, शेतीच्या मूल्यवर्धनासाठी प्राथमिक सुविधा उभारणे, वेअर हाउसिंग आदी प्रकल्पांसाठी पीकनिहाय सामुदायिक सुविधा निर्माण करण्यासाठी एमआयडीसीमध्ये जागा मिळावी, अशी मागणी या वेळी शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी केली. त्याला उद्योगमंत्री देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. एमआयडीसीच्या माध्यमातून कौशल्ये विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही देसाई यांनी सांगितले.

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नवीन औद्योगिक धोरणांमध्ये व्याज सवलत, वीज भाड्यात सवलत देण्याबाबत सादरीकरण केले. यामध्ये सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी, महाएफपीसीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शेतकरी कंपन्यांमुळे शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य दर मिळण्यास मदत होईल. कृषी माल निर्यात करण्यासाठी हातभार लागेल, फूड इंडस्ट्री वाढवण्यासाठी मदत होईल, असे या वेळी शेतकरी कंपन्यांच्या वतीने सांगण्यात आले. सध्या काही ठिकाणी कंपन्यांचे काम सुरू असून त्यातून पाच हजार जणांना रोजगार दिल्याचे कंपन्यांच्या वतीने सांगण्यात आले. औद्योगिक वसाहतीमध्ये शेतकरी कंपन्यांना जागा उपलब्ध झाल्यास त्यांना व्यवसाय वाढण्यास मदत होईल, असे शेतकरी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

इतर बातम्या
सागरी नत्र साखळीतील महत्त्वाच्या...सागरी पाण्यातील अमोनिया ऑक्सिडेशन करणारे...
औरंगाबादेत कामगारांची निदर्शने औरंगाबाद : बाजार समितीमधून हमाल-मापाड्यांची...
पुणे जिल्ह्यात ३७ लाख ३३ हजार टन ऊस...पुणे ः पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचा गळीत...
नांदेड विभागात २८ लाख क्विंटल साखरेचे...नांदेड ः नांदेड येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
जतला पाणी देण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री...जत, जि. सांगली ः तुबची बबलेश्वर (कर्नाटक)...
नाशिक जिल्ह्यात १५ लाख टन चारा उपलब्ध...नाशिक : राज्यातील दुष्काळी भागात गरज आणि मागणी...
बुलडाण्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना...बुलडाणा ः कमी पावसामुळे जिल्ह्यात शासनाने यावर्षी...
राज्यात टोमॅटो प्रतिक्विंटल ३०० ते १२००...सोलापुरात सर्वाधिक दर ८०० रुपये सोलापूर ः...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
दुष्काळात बॅंकांची सक्तीची वसुली थांबवा...बुलडाणा ः सध्या जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे...
चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
राज्यात थंडीत चढउतारपुणे : छत्तीसगडचा दक्षिण भाग, तेलंगणा आणि...
नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेती, गावतळे, जलसंपदा,...
जेजुरीत कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची...जेजुरी, जि. पुणे : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त...
पीककर्जासाठी उपोषणकर्त्या शेतकऱ्याचे...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
सव्वाआठ रुपये दर मिळाला तरच पपईची विक्रीजळगाव  : खानदेशात पपई उत्पादकांना सव्वाआठ...
दोन टप्प्यांत ‘एफआरपी’ला विरोधसातारा : साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता...
केळी दरांची अंमलबजावणी होईनाजळगाव : खानदेशात केळीच्या दरांबाबत दबाव...