खरेदी केंद्रांवर चाळण, ग्रेडिंगची व्यवस्था करा ः पणनमंत्री देशमुख

सुभाष देशमुख
सुभाष देशमुख

मुंबई : राज्यात उडीद, मूग, सोयाबीन खरेदीसाठी १६५ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असून, त्या ठिकाणी आलेल्या शेतकऱ्यांचा माल एफएक्यू दर्जाचा नसल्यास त्यांना परत जावे लागू नये, यासाठी सर्व केंद्रांवर चाळण व ग्रेडिंग मशिनची व्यवस्था तत्काळ उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बैठकीत दिले. बैठकीला पणन विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, नाफेडचे महाव्यवस्थापक ए. के. वर्मा, शाखा प्रबंधक नव्या आनंद, मार्केटिंग फेडरेशनचे सरव्यवस्थापक अनिल देशमुख आदी उपस्थित होते. किमान हमीभाव योजनेेअंतर्गत सुरू असलेल्या शेतमाल खरेदीमधील समस्या व त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. माल खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना त्या रकमेचा धनादेश न देता आरटीजीएस पद्धतीने तत्काळ त्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करावी. त्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणी तत्काळ सोडवाव्यात, अशा सूचना मंत्री देशमुख यांनी केल्या. तसेच सोयाबीन खरेदी करताना तुटलेले आणि रंग बदललेले सोयाबीन खरेदीचे निकष काही प्रमाणात शिथिल करण्याबाबत केंद्र शासनाला पाठविलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, असे निर्देश त्यांनी दिले. अँड्रॉईड ॲप, टोल फ्री क्रमांक  किमान हमीभाव योजनेेअंतर्गत शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागते. शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाइन नोंदणी करता यावी, यासाठी अँड्रॉइड ॲप तयार करावे, तसेच शेतकऱ्यांना माल विक्री आणि नोंदणी करताना येत असलेल्या समस्यांचे समाधान व्हावे, यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करावा, अशा सूचना देशमुख यांनी या वेळी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com