agriculture news in marathi, subhash deshmukh says government is committed for frp only, solapur, maharashtra | Agrowon

सरकार `एफआरपी`साठी बांधिल, जादा दरासाठी नाही
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

सोलापूर   ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर शेतकरी संघटनांनी रान उठवले असताना, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात ऊसदराच्या प्रश्नावर बोलताना गाळप झालेल्या उसाच्या एकूण बिलापोटी शेतकऱ्यांना `एफआरपी`ची रक्कम मिळवून देण्यात सरकार बांधील आहे. त्यापेक्षा जादा दर देण्याची जबाबदारी सरकारची नाही, असे स्पष्ट करत ऊसदरप्रश्नी सरकार किती गंभीर आहे, हे दाखवून दिले आहे, पण हे वक्तव्य करताना गतवर्षीच्या `एफआरपी`ची रक्कम अद्यापही न देणाऱ्या कारखान्यांवरील कारवाईचे सोईस्कर विस्मरण मात्र त्यांना झाल्याचे दिसले.

सोलापूर   ः ऊसदराच्या आंदोलनाने राज्यभर शेतकरी संघटनांनी रान उठवले असताना, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात ऊसदराच्या प्रश्नावर बोलताना गाळप झालेल्या उसाच्या एकूण बिलापोटी शेतकऱ्यांना `एफआरपी`ची रक्कम मिळवून देण्यात सरकार बांधील आहे. त्यापेक्षा जादा दर देण्याची जबाबदारी सरकारची नाही, असे स्पष्ट करत ऊसदरप्रश्नी सरकार किती गंभीर आहे, हे दाखवून दिले आहे, पण हे वक्तव्य करताना गतवर्षीच्या `एफआरपी`ची रक्कम अद्यापही न देणाऱ्या कारखान्यांवरील कारवाईचे सोईस्कर विस्मरण मात्र त्यांना झाल्याचे दिसले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी संघटना ऊसदर आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात ऊसदरासाठी संघर्ष सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरात पत्रकारांशी बोलताना मंत्री देशमुख यांनी हे वक्तव्य केले. श्री. देशमुख म्हणाले, की यंदाच्या हंगामात गाळपास आलेल्या उसाला पहिल्या हप्त्यापोटी एकरकमी `एफआरपी` देण्यासाठी सकारात्मक चर्चा सुरू आहे.

गुजरातमध्ये शेतकऱ्यांना टप्प्या-टप्प्याने `एफआरपी`ची रक्कम दिली जाते. त्या पद्धतीने आपल्याकडेही दिली जावी, अशी कारखानदारांची भूमिका आहे. पण त्याबाबत शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्या बैठकीत तोडगा काढला जाईल. पण `एफआरपी`च्या वर कारखान्यांनी किती रक्कम द्यावी, हा त्या-त्या कारखान्याचा प्रश्न आहे. त्याबाबत कारखाने निर्णय घेतील. पण एकूण बिलाच्या पोटी `एफआरपी` मिळवून देणे, ही सरकारची बांधिलकी आहे, असेही स्पष्टीकरण मंत्री देशमुख यांनी केले, पण अनेक कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या हंगामातील `एफआरपी`च्या कोट्यवधी रुपयांच्या रकमा थकवल्या आहेत. त्या कारखान्यांवर सरकारकडून झालेली धीम्या गतीची कारवाई आणि हे वास्तव असताना यंदा पुन्हा त्या कारखान्यांना दिलेले गाळप परवाने याबाबत मात्र सोईस्करपणे विस्मरण दाखवत माहिती घेऊ, कारवाई करू, असे ठोकळेबाज उत्तर त्यांनी दिले.

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...