agriculture news in marathi, subhash deshmukh says yashwant sugar mill will become a roll model, pune, maharashtra | Agrowon

यशवंत साखर कारखाना सरकार मॉडेल म्हणून चालवणार : सहकारमंत्री
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

पुणे : थेऊर (जि. पुणे) येथील बंद पडलेला यशवंत सहकारी साखर कारखाना मॉडेल म्हणून सरकारच्या वतीने चालवता येईल का, असे प्रयत्न सुरू अाहेत. येत्या हंगामापासून कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील लक्ष घातले आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

पुणे : थेऊर (जि. पुणे) येथील बंद पडलेला यशवंत सहकारी साखर कारखाना मॉडेल म्हणून सरकारच्या वतीने चालवता येईल का, असे प्रयत्न सुरू अाहेत. येत्या हंगामापासून कारखाना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील लक्ष घातले आहे, अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

पुणे बाजार समितीचे विभाजन करून पुणे हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची कागदाेपत्री नव्याने स्थापन करण्यात आल्याच्या निमित्ताने साेमवारी (ता. २) हवेली तालुका भाजपाच्या वतीने मंत्री देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, खडवासल्याचे आमदार भीमराव तापकीर, पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ, भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष राेहिदास उंद्रे, पुणे बाजार समितीचे माजी संचालक भूषण तुपे,  मंगेश माेडक, संताेष खांदवे, गाेरख दगडे, राजेंद्र काेरपे उपस्थित हाेते.

मंत्री देशमुख म्हणाले, की बंद पडलेल्या यशवंत कारखान्याच्या जमिनींमध्ये माेठ्या शक्तींना विशेष रस असल्याने ती शक्ती कारखाना सुरू हाेऊन देत नाही. जमिनींच्या लिलावासाठी आलेला व्यक्ती परत कसा जाईल, असे काम या ठिकाणी सुरू आहे. यामुळे वारंवार लिलावाची जाहिरात देऊनसुद्धा लिलाव हाेऊ शकेला नाही. यासाठी मॉडेल म्हणून सरकारकडून कारखाना चालविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे. येत्या हंगामात सरकारच कारखाना सुरू करेल.या वेळी तालुकाध्यक्ष राेहिदास उंद्रे यांच्या हस्ते मंत्री देशमुख यांचा संत तुकाराम महाराज यांची पगडी देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कारावर लाखाेंचा खर्च
मंत्री देशमुख यांचा सत्काराला विराेध असतानादेखील आमदार आणि कार्यकर्त्यांना चमकण्यासाठी सत्काराचा घाट घातला गेला हाेता. यासाठी लाखाे रुपयांचा खर्च करण्यात आला असून सभागृहाचे भाडे, फटाक्यांची आतषबाजी, फुलांचे महागडे गुच्छ, विविध पगड्या, स्मृतिचिन्हे, छायाचित्रणाबराेबर उंची केटरर्सला आॅर्डर देऊन जेवणावळदेखील ठेवण्यात आली हाेती.

यासाठी किमान पाच लाखांचा खर्च झाल्याची चर्चा हाेती. हाच कार्यक्रम पणन मंडळाच्या पंचतारांकित इमारतीमधील वातानुकूलित सभागृहात अथवा बाजार समितीच्या सभागृहातदेखील घेता आला असता. मात्र एवढा खर्च करण्याची गरज हाेती का? असा प्रश्‍न उपस्थित हाेत आहे.

इतर ताज्या घडामोडी
एचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर  ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....
इतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...
अभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...
ठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...
होळीमुळे द्राक्ष काढणी मंदावलीनाशिक : द्राक्षपट्ट्यात द्राक्ष काढणीसाठी आदिवासी...
एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौनसातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस...
‘बळिराजा'चे सोळा उमेदवार जाहीरकोल्हापूर : देशात शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच...
साताऱ्यात हिरवी मिरची ४०० ते ५०० रुपये...सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
धुळ्यात भाजपमध्ये अंतर्गत धुसफुसजळगाव ः लोकसभा निवडणुकीत भाजपचे जळगाव व...
नाशिकमध्ये युतीचे उमेदवार ठरेनानाशिक: लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाशिक व दिंडोरी...
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...