agriculture news in marathi, Subhash Deshmukh visits govt purchase center | Agrowon

'रिझेक्ट` सोयाबीन झाले `सिलेक्ट`! मंत्र्यांकडून झाडाझडती !! (Video)
हरी तुगांवकर
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

लातूर : शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱयांची कशी अडवणूक केली जाते याचा प्रत्यक्ष अनुभव  राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी (ता. ८) सकाळी येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर घेतला. ग्रेडरने `ऱिझेक्ट` केलेल्या सोयाबीनची थप्पी केंद्रात लावण्यात आली होती. त्यातील माल श्री. देशमुख यांनी काढून पुन्हा मशीनवर मोजायला लावला. तर त्यात हे सोयाबीन `सलेक्ट `झाले. संबधीत कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. शासकीय अधिकाऱयांमुळेच शासनाच्या योजना फेल ठऱत असल्याची टिप्पणी श्री. देशमुख यांनी या दौऱयात केली.

लातूर : शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱयांची कशी अडवणूक केली जाते याचा प्रत्यक्ष अनुभव  राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी (ता. ८) सकाळी येथील शासनाच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर घेतला. ग्रेडरने `ऱिझेक्ट` केलेल्या सोयाबीनची थप्पी केंद्रात लावण्यात आली होती. त्यातील माल श्री. देशमुख यांनी काढून पुन्हा मशीनवर मोजायला लावला. तर त्यात हे सोयाबीन `सलेक्ट `झाले. संबधीत कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. शासकीय अधिकाऱयांमुळेच शासनाच्या योजना फेल ठऱत असल्याची टिप्पणी श्री. देशमुख यांनी या दौऱयात केली.

सहकारमंत्री श्री. देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी येथे शासकीय खरेदी
केंद्र व शेतमाल तारण योजनेचा आढावा बैठक घेतली. या बैठकीत अनेक
लोकप्रतिनिधींनी सोयाबीन खरेदी केंद्रावर कशा पद्धतीने अडवणूक सुरु आहे याचा पाढाच मंत्र्यांसमोर वाचला. औशाच्या खरेदी केंद्रावर खरेदी केलेला माल लातूरच्या गोदामात आणून टाकला जात आहे. तेथील गोदाम रिकामेच ठेवले जात आहे असे श्री. सोमवंशी यांनी वेळी निदर्शनास आणून दिले. श्री. देशमुख यांनी तातडीने वखार महामंडळाच्या वरिष्ठांना मोबाईलवर बोलून तेथील गोदाम उपलब्ध करून दिले. वाहतूकदारांना जगवण्याचे हे षडयंत्र आहे. मुंबईत बसून आम्हाला हे कळत नाही. त्यामुळे आता लातूर ते नागपूरला जाताना सर्व जिल्ह्यात ठिकठिकाणी भेटी देवून पाहणी करीत आहे, असे श्री. देशमुख या वेळी म्हणाले.

लातूर खरेदी केंद्रावरील अडवणुकीचा प्रकार सहकारमंत्र्यांनीच अनुभवला

अधिकाऱयांकडून सर्व काही अलबेल आहे असे सांगितले जात आहे. पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. ठिकठिकाणी उद्रेक दिसत आहे. अधिकाऱय़ामुळेच शासनाच्या योजना फेल ठरत आहेत. नाफेड व वखार महामंडळ यांच्यात काहीच समन्वय नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी जावून अडचणी समजून घेण्याचा मी प्रयत्न करीत
आहे. अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या तर तातडीने त्या दाखवून द्याव्यात
असे श्री. देशमुख म्हणाले. यावेळी श्री. देशमुख यांनी सोयाबीन खरेदी
केंद्राला भेट दिली. तेथे रिझेक्ट केलेले सोयाबीन ठेवले होते. त्याची
तपासणी पुन्हा करायला लावली. यात ते सलेक्ट झाले. यात संबंधीतावर कारवाई करण्याचे आदेश श्री. देशमुख यांनी दिले.

इतर अॅग्रो विशेष
रसायन विरहित फायद्याची शेती शक्य भारतात आज नेमकी सेंद्रिय व नैसर्गिक शेती...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक,...डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद...
केवळ जमीन आरोग्यपत्रिकेचा उपयोग नाही :...परभणी :जमीन आरोग्यपत्रिकेतील शिफारशीनुसार...
विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या...पुणे : विदर्भाच्या काही भागांत थंडीत वाढ झाली आहे...
मातीची हाक मातीचा कस घटल्यामुळे मरणपंथाला लागलेल्या जमिनी...
मातीच्या घनीकरणाने घटते उत्पादनजमीन खराब होण्याचे एक महत्त्वाचे कारण   ...
समजून घ्या जमिनीची आरोग्यपत्रिकाबऱ्याच शेतकऱ्यांकडे जमिनीची आरोग्यपत्रिका उपलब्ध...
सावधान, सुपीकता घटते आहे... पुणे : महाराष्ट्रातील भूभागाचे मोठ्या...
अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला जालन्यात...जालना : सर्वांची उत्सुकता लागून असलेल्या सकाळ-...
शून्य मशागत तंत्रातून कस वाढविला...मी १९७६ पासून आजपर्यंत जमिनीची सुपीकता...
सेंद्रिय कर्बावर अवलंबून जमिनीची सुपीकताजमिनीस भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म हे...
भूमिगत निचरा तंत्राद्वारे क्षारपड...सुरू उसात दक्षिण विभागात पहिला क्रमांक उरुण...
अतिपाण्यामुळे क्षारपड होतेय जमीनक्षारपड-पाणथळ जमिनीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी...
जैवइंधन, जैवखते, ठिबक उपकरणांच्या...२९ वस्तू आणि ५३ सेवांच्या जीएसटी दरामध्ये कपात...
प्रगतीच्या दिशेने पाऊलराज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेपासून ते १९९०...
सहकारी बॅंका डिजिटाइज केव्हा होणार?डिजिटल बॅंकिंग याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाच्या...
कारखाने, ऊस उत्पादकांचे नुकसान...नवी दिल्ली : साखरेच्या घाऊक दरात घसरण होऊनही...
इंडोनेशिया, चीनला द्राक्ष निर्यातीत...नाशिक : रशिया, चीन, इंडोनेशिया अशा काही देशांनी...
किमान तापमानाचा पारा वाढू लागलापुणे : दक्षिण कर्नाटकाच्या परिसरात चक्राकार...
कृषी संजीवनी प्रकल्पाची मंजुरी अंतिम...मुंबई : दुष्काळापासून शेतीचे संरक्षण आणि खारपाण...