agriculture news in marathi, subhsh deshmukh says loan wavier scheme will continue, solapur, maharashtra | Agrowon

कर्जमाफीचा अर्ज आता तालुका निबंधकांकडे करा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

सोलापूर ः शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी अर्ज करण्यास वारंवार मुदतवाढ दिली. शिवाय त्याची व्याप्तीही वाढवली. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. पण अद्यापही कोणी अर्ज भरला नसेल आणि ऑनलाइन मुदत संपली असली, तरी तालुका स्तरावरील सहायक निबंधकांकडे अर्ज करावा, जोपर्यंत पात्र शेतकरी येतील, तोपर्यंत ही योजना चालूच राहील,’’ असे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

सोलापूर ः शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी अर्ज करण्यास वारंवार मुदतवाढ दिली. शिवाय त्याची व्याप्तीही वाढवली. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. पण अद्यापही कोणी अर्ज भरला नसेल आणि ऑनलाइन मुदत संपली असली, तरी तालुका स्तरावरील सहायक निबंधकांकडे अर्ज करावा, जोपर्यंत पात्र शेतकरी येतील, तोपर्यंत ही योजना चालूच राहील,’’ असे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.

श्री. देशमुख यांनी सोमवारी (ता. १८) येथे पत्रकारांना केंद्र शासनाला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शासनाच्या विविध विकासकामांची माहिती दिली. श्री. देशमुख म्हणाले, की केंद्र व राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी केली आहे. सामान्य माणसांच्या गरजा लक्षात घेऊन काम केले आहे. प्रत्येक योजनेचा, अभियानाचा पद्धतशीर आराखडा आखून कामे केली. त्यामुळेच आज एका नव्या दिशेने देश चालल्याचे आपल्याला दिसते. देश बदलणे ही एक प्रक्रिया आहे, ती एका दिवसात होऊ शकणार नाही. त्याला वेळ लागेल, आता त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जीएसटी किंवा डिजिटलायझेशन हे या टप्प्यातील महत्त्वाचे निर्णय आहेत. त्याचे परिणाम दिसू लागतील.

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून कर्जमाफी योजना आणली. त्यासाठी अजूनही वेळ गेलेला नाही. राहिलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करावेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून यंदा केंद्राने कृषीसाठी ११ लाख कोटी रुपयांचे बजेट ठेवले. शेतीमालाच्या बाजारपेठेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या हेतूने दोन हजार कोटी रुपयांचा निधी ठेवला आहे. डाळींच्या बफर स्टॉकची मर्यादा दीड लाख टनांवरून २० लाखांवर वाढवली आहे. त्याशिवाय २८.५ लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. ई-नामच्या माध्यमातून ५८५ मार्केट विकसित करण्यात आली आहेत. जवळपास ८७ लाख ५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी त्यासाठी झालेली आहे, असेही श्री. देशमुख म्हणाले.

`बाजार समिती, डीसीसीच्या कारवाईत माझा संबंध नाही`
सोलापूर बाजार समितीच्या तत्कालीन संचालकांवर कारवाई आणि जिल्हा बॅंकेच्या बरखास्तीच्या प्रश्‍नावर सहकारमंत्री देशमुख यांनी यात थेट माझा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करून बाजार समितीचे तक्रारदार तत्कालीन काँग्रेसचे नेतेच आहेत. त्या तक्रारीवर आता कारवाई झाली इतकंच आणि जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची बरखास्ती मी नव्हे, रिझर्व्ह बॅंकेच्या शिफारशीनुसार झाली आहे. मी कधीही सुडाचे राजकारण केलेले नाही. त्यामुळे या दोन्ही विषयांशी माझा संबंध नाही, असेही मंत्री देशमुख म्हणाले.

इतर ताज्या घडामोडी
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...