agriculture news in marathi, Submit cases to water supply committees | Agrowon

पाणीपुरवठा समित्यांवर गुन्हे दाखल करा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

जळगाव : भारत निर्माण योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ५४ पाणीपुरवठा योजनांमधील गैरव्यवहार प्रकरणी संबंधित गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

जळगाव : भारत निर्माण योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ५४ पाणीपुरवठा योजनांमधील गैरव्यवहार प्रकरणी संबंधित गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

भारत निर्माण योजनेतून संबंधित पाणी योजनांसाठी निधी मंजूर झाला. ग्रामपंचायतींच्या खात्यात तो निर्देशानुसार वर्ग झाला. योजना राबविण्याची जबाबदारी, खर्चासंबंधीचे अधिकार गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीवर नियमानुसार दिली होती. पण योजना अपूर्णच आहेत. त्यात काही योजना २००४ पासून अपूर्ण आहेत. कामांच्या नोंदी नसणे, रेकॉर्ड उद्ययावत नसणे, कामांचे व्हिडिओ चित्रीकरणाचे आदेश धुडकावणे आदी प्रकार जिल्हा परिषदेतील वरिष्ठांना तपासणीत दिसून आले.

या योजनेतून १९० कामेच जिल्हाभरात पूर्ण झाली. तर २८० कामे अपूर्ण असून, यातील ५४ ग्रामपंचायतींतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये गैरव्यवहार दिसून आला. त्यामुळे गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत.

...तर जिल्हास्तरावरून कार्यवाही
संबंधित ५४ योजनांप्रकरणी प्रथम पाणीपुरवठा समितीवर गुन्हे दाखल करावेत. संबंधित तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अभियंता किंवा अधिकारी यांनी फिर्याद दाखल करायची. फिर्याद सात दिवसांत दिली नाही, तर जिल्हास्तरावरून थेट सीईओ कार्यालय फिर्याद दाखल करण्याचे काम हाती घेईल, असेही सीईओ दिवेगावकर यांनी बजावले आहे.

इतर ताज्या घडामोडी
पुणे बाजारात २२५ ट्रक भाजीपाल्याची आवकपुणे ः राज्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे...
पुणे, साताऱ्यातील १५ गावे, ७५...पुणे  : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या पश्‍चिम...
अौरंगाबाद जिल्ह्यात बोंड अळीचा...औरंगाबाद : गतवर्षीच्या तुलनेत यंदा मराठवाड्यातील...
पुणे विभागात चारा पिकांची ९२ हजार हेक्‍...पुणे : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण भासू...
सीना धरणातील पाणीसाठ्यात घटकुळधरण, जि. नगर : सीना मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट...
‘समृद्धी’साठी जमीन संपादन प्रक्रिया...अकोला : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी...
वनौषधी उत्पादकांनी केली अनुदानाची मागणीअमरावती  ः पानपिंपरी तसेच वनौषधी...
मराठा आरक्षणासाठी आजपासून पुण्यात चक्री...पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी...
नगरमध्ये कामगंध सापळे मिळेनात नगर ः जिल्ह्यामध्ये यंदा जनजागृती करूनही कापसावर...
पानसरे हत्येच्या तपासाला मिळणार गती कोल्हापूर - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक...
डॉ. दाभोलकरांचा मारेकरी अटकेत; पाच...मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ....
दाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही...औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ...
उपसरपंचानेच केली सावकारकीला कंटाळून...फलटण, जि. सातारा : खासगी सावकारकीच्या...
आंतरमशागत, जलसंधारण सरी फायदेशीर...आंतरमशागतीमुळे माती भुसभुशीत होते. जमिनीतील ओलावा...
औरंगाबाद येथे हिरवी मिरची २००० ते २५००... औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
चुंबकीय नॅनो तंत्रज्ञानाद्वारे...राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी विहिरीतील तेलाचा...
ओळखा जनावरांमधील सर्पदंश...पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात...
पुणे जिल्ह्यातील धरणे ‘ओव्हरफ्लो’ पुणे  : जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
कोल्हापूरच्या पश्‍चिमेकडे पावसाचा जोर...कोल्हापूर  : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात...
पुणे जिल्ह्यात दीड लाख हेक्‍टरवर खरिपपुणे   ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पुणे...