agriculture news in marathi, Submit the grants to the farmers promptly | Agrowon

शेतकऱ्यांचे अनुदान तातडीने खात्यात जमा करा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 जानेवारी 2018

बुलडाणा ः मोताळा तालुक्यातील महाल पिंप्री शिवारातील शेतकरी गारपीट, पीकविम्यापासून वंचित असून त्यांची रक्कम तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली अाहे.

बुलडाणा ः मोताळा तालुक्यातील महाल पिंप्री शिवारातील शेतकरी गारपीट, पीकविम्यापासून वंचित असून त्यांची रक्कम तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली अाहे.

संघटनेच्या विद्यार्थी अाघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख यांनी तहसिलदारांना निवेदन देत आठ दिवसांत रक्कम जमा न झाल्यास तहसील कार्यालयात बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा दिला अाहे. मोताळा तालुक्यातील महाल पिंप्री येथील दोनशे शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही २०१४-१५ यावर्षांत झालेल्या गारपिटीची नुकसान भरपाई, २०१५-१६ च्या हंगामातील पीक विम्याचे अनुदान जमा झालेले नाही. पवन देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी मोताळा तहसीलदारांची भेट घेवून निवेदन दिले.

लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तलाठ्यांनी तहसीलकडे पाठविल्या; मात्र आपल्या तहसीलस्तरावरून सदर कामास विलंब होत असल्याची बाब निदर्शनास अाणून देण्यात अाली. येत्या आठ दिवसांत सर्व शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात अाला. या वेळी सय्यद वसीम, प्रदिप शेळके, महेंद्र जाधव, गोपाल खोंदले व टाकरखेड येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...