agriculture news in marathi, submit the report of market committee employees administration, pune, maharashtra | Agrowon

बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर घेण्याबाबतचा अहवाल सादर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याचा पणन संचालकांचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेताना सचिवपदी सहकार खात्यातील श्रेणी २ पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊ नये, अशी शिफारस पणन संचालकांनी शासनाला केली आहे. आस्थापनेवर कर्मचारी घेतल्यास शासनावर १०० काेटी रुपयांचा अतिरिक्त बाेजा पडणार असल्याचेही अहवालात म्हटले आहे.   

पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्याचा पणन संचालकांचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घेताना सचिवपदी सहकार खात्यातील श्रेणी २ पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येऊ नये, अशी शिफारस पणन संचालकांनी शासनाला केली आहे. आस्थापनेवर कर्मचारी घेतल्यास शासनावर १०० काेटी रुपयांचा अतिरिक्त बाेजा पडणार असल्याचेही अहवालात म्हटले आहे.   

बाजार समित्यांना शासनाच्या आस्थापनेवर घेण्यात यावे, अशी मागणी बाजार समिती कर्मचारी संघाने शासनाकडे केली हाेती. त्यानुसार पणन संचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीने अंतिम अहवाल शासनाला सादर केला आहे. या अहवालानुसार ३०७ बाजार समित्यांमधील ७ हजार ५१ मंजूर पदांपैकी ५ हजार १० कर्मचारी सेवेत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत दाखल करून घेण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. शासन सेवेत दाखल झाल्यामुळे बाजार समित्यांमध्ये सध्या खरेदीदारांकडून वसूल हाेत नसलेली देखरेख फी वसूल हाेण्यास फायदा हाेऊन, बाजार समित्यांचे उत्पन्न वाढेल, असे नमूद करण्यात आले असून, सध्याचा आस्थापनेवरील खर्च आणि शासन सेवेत समाविष्ट केल्यानंतरचा खर्च असा एकूण ४०० काेटींचा बाेजा शासनाच्या तिजाेरीवर पडणार आहे.

याबाबत बाेलताना बाजार समिती कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिलीप डेबरे म्हणाले, की आमची अनेक दिवसांची मागणी अंतिम टप्प्यात आल्याचे समाधान आहे. पणन संचालकांनी सकारात्मक अहवाल शासनाला सादर केला आहे. हा अहवाल शासनाने स्वीकारल्यास बाजार समिती कर्मचारी राजकीय दडपणातून बाहेर येऊन अधिक चांगले काम करतील. यामधून बाजार समित्यांचे उत्पन्न वाढीस मदत हाेईल. हा अहवाल स्वीकारताना शिपाई पासून ते सचिवांपर्यंत सर्वांना शासनसेवेत समाविष्ट करून घ्यावे अशी आमची मागणी आहे.

या आहेत शिफारशी

 • बाजार समितीचे सेवक शासकीय सेवेत समाविष्ट केल्यास कामकाजावर नियंत्रण ठेवणे शक्य हाेईल.
 • सचिवपद हे अधिनियमातील ३५ अ नुसार भरण्यावर शासनस्तरावर निर्णय व्हावा (३५ अ नुसार सहकार विभागातील अधिकाऱ्यांची सचिवपदी नियुक्ती व्हावी.)
 • कर्मचारी आस्थापनाविषयक बाबी कृषी पणन मंडळाने हाताळणे याेग्य नाही.

दृष्टिक्षेपात बाजार समित्या

 • राज्यात ३०७ बाजार समित्या
 • वार्षिक उलाढाल ६० हजार काेटी (२०१६-१७ नुसार)
 • बाजार समित्यांचे वार्षिक उत्पन्न ७८७ काेटी
 • एकूण खर्च ५४५ काेटी
 • आस्थापना खर्च २६८ काेटी
 • शासनाला मिळणारा महसूल २८ काेटी
 • २२४ बाजार समित्या फायद्यात तर ८३ ताेट्यात
 • ३०७ बाजार समित्यांमध्ये मंजूर ७ हजार ५१ पदांपैकी ५ हजार १० पदे भरलेली, १८३७ पदे राेजंदारीवर

इतर ताज्या घडामोडी
कृषी विभाग म्हणते, पॉलिहाउस, शेडनेट...जळगाव ः खानदेशात १ ते ११ जून यादरम्यान झालेल्या...
केळी पीकविमाधारकांना परताव्यांची...जळगाव  ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत...
कांदा निर्यात, प्रक्रियेवर भर गरजेचा ः...राजगुरुनगर, जि. पुणे : कांदा बाजारभावातील अनिश्‍...
सात महिन्यांपूर्वी विकलेल्या मुगाचे...अकोला ः नाफेडने खरेदी केलेल्या मुगाचे पैसे सात...
महावितरण’द्वारे देखभाल, दुरुस्तीची ९०३३...‘सातारा : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व...
रत्नागिरीत खतनिर्मिती कारखान्यावर छापारत्नागिरी : येथील एमआयडीसी परिसरात मच्छीच्या...
आषाढी पालखी सोहळ्यासाठी आरोग्य विभाग...पुणे : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर...
गोंदिया जिल्ह्यात २ लाख हेक्‍टरवर...गोंदिया ः राइससिटी असा लौकिक असलेल्या गोंदिया...
औरंगाबाद जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती औरंगाबाद : जिल्ह्यातील ७७८ गाव व २७२...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत २०१८-...
जतला कर्नाटकातून पाणी मिळणे धूसरसांगली : कर्नाटकातून कृष्णेचे पाणी जत तालुक्याला...
आषाढी वारीत ३५ हजार विद्यार्थी करणार...सोलापूर : आषाढी वारीत पाच विद्यापीठांतील ३५ हजार...
कात्रजकडून गायीच्या दूध खरेदीदरात वाढपुणे  : दुष्काळी स्थितीत दूध उत्पादक...
विधीमंडळ अधिवेशन ः सलग तिसऱ्या दिवशीही...मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही...
हायब्रीड बियाणे किमतीवर सरकारी नियंत्रण...पुणे  : महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती...
सरकारला शेतकऱ्यांचे काहीच पडलेले नाही ः...मुंबई  : ''किडनी घ्या; पण बियाणे द्या...
‘सर्जा-राजा’ला माउलींच्या रथाचा मानमाळीनगर, जि. सोलापूर  : संत ज्ञानेश्‍वर...
पूर्णवेळ संचालकानेच लावले  `केम`...अमरावती  ः कृषी समृद्धी समन्वयित प्रकल्पातील...
तत्कालीन प्रकल्प अधिकारी ‘केम’...मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील कृषी...
कृषी सल्ला : पानवेल, गुलाब, ऊस, मका,...हवामान ः पुढील पाचही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहील...