agriculture news in Marathi, subodh sawaji still on fast in a well, Maharashtra | Agrowon

सुबोध सावजींचा विहिरीतच मुक्काम
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जानेवारी 2018

अकोला ः पाणीपुरवठा योजनांच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरप्रकार झाला असून, त्याविरुद्ध माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी योजनेच्या विहिरीत उपोषण सुरू केले अाहे. या अांदोलनामुळे जिल्ह्यातील यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून, तपास सुरू झाला अाहे. 

अकोला ः पाणीपुरवठा योजनांच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरप्रकार झाला असून, त्याविरुद्ध माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी योजनेच्या विहिरीत उपोषण सुरू केले अाहे. या अांदोलनामुळे जिल्ह्यातील यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून, तपास सुरू झाला अाहे. 

बुलडाणा जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांच्या कामात अनियमितता, तसेच भ्रष्टाचार झाल्याचा अारोप सुबोध सावजी यांनी केला अाहे. त्यातही मेहकर तालुक्यातील १४० गावांत सर्वत्र योजनांमध्ये गोंधळ असल्याचे त्यांनी म्हटले अाहे. शासकीय निधीतून झालेल्या या योजनांमध्ये मंजूर ठिकाणची विहीर दुसरीकडे खोदणे, मोजमाप घेतले असता कमीभरणे, बिल जास्तीचे काढणे, पाइपलाइन करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे, वर्षानुवर्षे वीजपुरवठा नसतानाही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित दाखवणे, विहिरीचे दानपत्र न केल्याने अद्यापही मालकी शेतकऱ्यांच्या सातबारावरच राहणे, असे गंभीर प्रकार श्री. सावजी यांनी समोर अाणले अाहेत. 

याविषयी चौकशी करून दोषींविरुद्ध कठोर कारवाईसाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत अाहेत. अद्यापही प्रशासनाने गांभीर्याने चौकशी न केल्याने अखेरीस गुरुवारी (ता. १८) सायंकाळी त्यांनी थेट विहिरीत मुक्काम ठोकला. यामुळे प्रशासकीय यंत्रणा वेगाने हलू लागल्या. रात्री सव्वा अकरा वाजता अधिकाऱ्यांनी विहिरीचे मोजमाप केले. तर शुक्रवारीही प्रशासकीय स्तरावर तपास सुरू झाला. 
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...