agriculture news in marathi, Subsidize milk otherwise compilation will stop from December 1 | Agrowon

दुधाला अनुदान द्या; अन्यथा १ डिसेंबरपासून संकलन बंद
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर : गाय दुधाचे कमी केलेले दर पूर्ववत करण्यासाठी शासनाने प्रतिलिटर दुधाला पाच रुपये अनुदान दिले पाहिजे. अन्यथा १ डिसेंबरपासून राज्यातील दूध संकलन बंद केले जाईल, असा इशारा सहकारी व खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींनी बुधवारी (ता. ८) शासनाला दिला. शासनाला अनुदान देणे जमत नसेल तर दूध पावडर तयार करण्यासाठी खर्च द्यावा किंवा राज्यात अतिरिक्त होणारे दूध शासनाने स्वत: खरेदी करावे, अशी मागणीही दूध संघांच्या प्रतिनिधींनी केली.

कोल्हापूर : गाय दुधाचे कमी केलेले दर पूर्ववत करण्यासाठी शासनाने प्रतिलिटर दुधाला पाच रुपये अनुदान दिले पाहिजे. अन्यथा १ डिसेंबरपासून राज्यातील दूध संकलन बंद केले जाईल, असा इशारा सहकारी व खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींनी बुधवारी (ता. ८) शासनाला दिला. शासनाला अनुदान देणे जमत नसेल तर दूध पावडर तयार करण्यासाठी खर्च द्यावा किंवा राज्यात अतिरिक्त होणारे दूध शासनाने स्वत: खरेदी करावे, अशी मागणीही दूध संघांच्या प्रतिनिधींनी केली.

येथे कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातील सहकारी व खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यानंतर या प्रतिनिधींनी पत्रकारांशी संवाद साधला.

राजारामबापू पाटील संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील म्हणाले, दुधाला जादा दर मिळाला पाहिजे, यात शंका नाही. शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे गेले पाहिजेत. पण, सध्या दूध पावडर, लोणी, तुपाची मागणी काय आहे. याचा वास्तव विचार शासनाने केला पाहिजे. राज्यात प्रतिदिन 2 कोटी 87 लाख लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. त्यातील सुमारे 2 कोटी लिटर दूध बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होते.

राज्यात सध्या दुधाचे 60 टक्के खासगी क्षेत्रात व 40 टक्के सहकारी क्षेत्रात संकलन होत आहे. यापैकी सर्वाधिक दुधाची पावडर होते; तर उर्वरित दुधाची थेट विक्री केली जाते. राज्यात 11 कोटी 24 लाख लोकसंख्या आहे. या पैकी ग्रामीण भागात 6.15 कोटी लोखसंख्या असून 5.9 कोटी लोक शहरात राहतात. दरम्यान, संकलित होणाऱ्या जादा दुधापैकी अतिरिक्त ठरणाऱ्या दुधाची भुकटी केली जाते.

आता जागतिक पातळीवरच या बुकटीचे दर कमी झाले आहेत. लोणी व तुपाचेही अतिरिक्त उत्पन्न असल्याने त्याचा उठाव होत नाही. प्रसंगी या दुधाचे दर कमी होत आहेत. तरीही गायीच्या दुधाचे दर कमी करू नये यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. शासनाने दर वाढीबाबत किंवा निश्‍चित देण्यासाठी प्रतिलिटर मागे 5 रुपये अनुदान द्यावे, अनुदान देणार नसाल तर पावडर निर्मितीसाठी येणारा खर्च द्यावा किंवा राज्यात अतिरिक्त संकलित होणारे दूध स्वत: खरेदी करावे.

शासन कोणताही अभ्यास न करता केवळ राजकारण करत असल्यामुळे संघ आणि शेतकरी अडचणीत येत असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी एनडीडीबीचे अध्यक्ष अरुण नरके, महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार, फलटण जिल्हा दूध संघाचे रणजित निंबाळकर, गोकूळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील, भारत डेअरीचे किरीट मेहता, सोलापूर दूध संघाचे मारुती लव्हटे, पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक गोपाळराव मस्के, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन निडूरकर, कराड येथील कोयना दूधचे अमोल गायकवाड उपस्थित होते.

अशा आहेत मागण्या  

  • गायीच्या दुधाला प्रतिलिटर 5 रुपेय अनुदान द्यावे
  • अनुदान संघाला न देता शेतकऱ्यांच्या थेट खात्यांवर जमा करावे
  • पावडर निर्मितीसाठी प्रतिलिटर 4 ते 5 रुपये खर्च द्यावा
  • अनुदान देणे जमत नसेल तर अतिरिक्त दूध शासनाने खरेदी करावे
  • बटर, तुपावरील जीएसटी पूर्ववत करावा

इतर अॅग्रो विशेष
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...
कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपातनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील...
जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून '...पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन...
फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..! नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण...