agriculture news in marathi, subsidy of medicinal plant grower | Agrowon

राज्यातील वनौषधीधारकांचे अनुदान रखडले
टीम अॅग्रोवन
सोमवार, 8 जानेवारी 2018

नागपूर : राज्यात 2014-15 या वर्षात सुमारे 600 हेक्‍टर क्षेत्रावर वनौषधीची लागवड होती. परंतु अनुदान न मिळाल्याने हे क्षेत्र दुसऱ्या वर्षी निम्म्यावर आले आहे. महाराष्ट्र फलोत्पादन व वनौषधी मंडळ असेपर्यंत राज्यातील वनौषधी उत्पादकांना मिळणारे अनुदान आयुष्य मंडळाच्या स्थापनेनंतर मात्र मिळणे बंद झाल्याने वनौषधी उत्पादकांमध्ये रोष आहे.

नागपूर : राज्यात 2014-15 या वर्षात सुमारे 600 हेक्‍टर क्षेत्रावर वनौषधीची लागवड होती. परंतु अनुदान न मिळाल्याने हे क्षेत्र दुसऱ्या वर्षी निम्म्यावर आले आहे. महाराष्ट्र फलोत्पादन व वनौषधी मंडळ असेपर्यंत राज्यातील वनौषधी उत्पादकांना मिळणारे अनुदान आयुष्य मंडळाच्या स्थापनेनंतर मात्र मिळणे बंद झाल्याने वनौषधी उत्पादकांमध्ये रोष आहे.

पारंपरिक पिकाच्या तुलनेत जास्त पैसे मिळत असल्याने राज्यातील शेतकरी सफेद मुसळी, लेंडीपिंपळी, अश्‍वगंध यांसारख्या पिकांकडे वळले होते. अकोला, अमरावती, बुलडाणा या जिल्ह्यांत वनौषधीखालील सर्वाधिक क्षेत्र आहे. अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) येथे वनौषधी खरेदी विक्रीची बाजारपेठही या तीन जिल्ह्यांकरिता विकसित झाली होती. दिल्ली येथील आयुर्वेदिक औषधी निर्मात्या कंपन्यांकरिता येथूनच व्यापाऱ्यांद्वारे खरेदी होत होती. या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला पैसाही मिळत होता. वनौषधी खरेदीदारांकडून अपेक्षित पैसे न मिळाल्यास शेतकरी ही तूट शासकीय अनुदानातून भरून काढत. त्यामुळे हे पीक राज्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरले होते.

कृषी विभागामार्फत वनौषधी लागवड असलेल्या शेताचे सर्वेक्षण करून अनुदानाचा प्रस्ताव महाराष्ट्र फलोत्पादन व वनौषधी मंडळाला पाठविला जात होता. त्यानंतर या शेतकऱ्यांना लागवडीपोटी अनुदान मिळायचे. आता मात्र आयुष्य मंडळाच्या अखत्यारित अनुदानाचा विषय गेल्याने गेल्या दोन वर्षांपासून वनौषधी लागवडकर्त्या शेतकऱ्यांची अनुदानासाठी फरपट सुरू आहे. याचा फटका राज्यात सर्वाधिक 90 टक्‍के लागवड क्षेत्र असलेल्या अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना बसला आहे. विशेष म्हणजे या संदर्भाने कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांची भेट घेत त्यांच्यासमोर ही शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले होते. त्यानंतर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनाही निवेदन सादर करण्यात आले. त्याचा काही एक उपयोग झाला नसल्याचे वनौषधी उत्पादक सांगतात.

राज्यातील वनौषधी उत्पादक जिल्हे व क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
ठाणे ः 2.5, जळगाव ः 1.65, सातारा ः 5, जालना ः 1, लातूर ः 5.13, उस्मानाबाद ः 17.6, अकोला ः 186.6, अमरावती ः 267.2, बुलडाणा ः 48.49, यवतमाळ ः 2.1, वर्धा ः 10, नागपूर ः 48.9, चंद्रपूर ः 2.38, भंडारा ः 0.52, एकूण ः 599.07

(सफेद मुसळीकरिता अनुदान ः 1 लाख 10 हजार रुपये/हेक्‍टरी)
 

 

राज्याचे आयुष्य मंडळ केंद्रीय मंडळाच्या बैठकीत आपल्या भागातील वनौषधी लागवडीचे सादरीकरण करून अनुदानाची मागणी नोंदवितात. परंतु या वेळी महाराष्ट्राचा एकही प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नव्हता, असे ऐकले आहे. गेल्या वर्षी राज्याचे आयुष्य मंडळ स्थापण्यास वेळ लागला. या कारणांमुळे दोन्ही वर्षी शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले. यापुढील काळात तरी शेतकऱ्यांना अनुदान मिळावे याकरिता खबरदारी घेण्याची गरज आहे.
- विजय लाडोळे, वनौषधी अभ्यासक, अंजनगावसुर्जी, जि. अमरावती.

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...