शेडनेट, पॉलिहाउससाठी एक एकरापर्यंत अनुदान

शेडनेट
शेडनेट

पुणे : हरितगृह, पॉलिहाउसला मागणी वाढत असल्याने कृषी विभागाने संरक्षित शेतीच्या क्षेत्राच्या मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षापासून राज्यातील शेतकऱ्यांना जवळपास एक एकरापर्यंत अनुदान मिळणार आहे.    बदलत्या हवामानाच्या काळात शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी अनेक शेतकरी हरितगृह आणि शेडनेटचा वापर करू लागले आहेत. आर्थिक खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नसल्याने अनेक शेतकरी कृषी विभागाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेत आहे. शासनाकडूनही प्रोत्साहन म्हणून ५० टक्केपर्यत अनुदान दिले जाते. त्यासाठी पूर्वी दहा ते वीस गुंठ्यांची मर्यादा घालण्यात आली होती. मात्र, आता ही मर्यादा वाढवून ती एक एकरापर्यंत वाढविण्यात आली आहे.  दरवर्षी कमी उपलब्ध होत असलेल्या निधीमुळे जिल्हा पातळीवरील स्थापन केलेल्या समिती आलेल्या अर्जानुसार शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे क्षेत्राची मर्यादा घातल्यामुळे जास्तीत जास्त चार ते साडेचार लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळत होते. मात्र, पूर्वी घातलेल्या मर्यादेमुळे अधिक क्षेत्रावर उभारणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. कागदोपत्री अनुदान दिल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असली, तरी क्षेत्र कमी दिसत असल्याचे चित्र होते. यंदाच्या वर्षापासून क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने ही मर्यादा वाढविली आहे. यंदा हरितगृह आणि पॉलिहाउससाठी अनुदान देण्यासाठी एनएचएम विभागाने आॅगस्ट महिन्यात अर्ज मागविले होते. दोन्ही घटक मिळून जवळपास १७ हजारांच्या आसपास अर्ज दाखल होते. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी या अर्जाची छाननी करून लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली आहे. निवड केलेल्या अनेक शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिली असून, शेतकऱ्यांच्या पातळीवर हरितगृह, पॉलिहाउसची उभारणी करत आहे. त्यासाठी लवकरच अनुदान दिले जाणार आहे.   निधी मिळविण्यासाठी प्रयत्न यंदा कृषी विभागाकडून शासनाला पाठविलेल्या शेडनेट आणि पॉलिहाउससाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ७५ कोटी, तर राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून २५ कोटी रुपये, असे एकूण १०० कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अजून ३० ते ४० कोटी रुपये मिळविण्यासाठी कृषी आयुक्तलयाच्या स्तरावरून प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com