agriculture news in marathi, Success story of cotton grower Atul Madhukar patil from kerhale, Raver, Jalgaon | Agrowon

बोंड अळीच्या चक्रव्यूहात साधले देशी कापसाचे गुणवत्तापूर्ण उत्पादन
चंद्रकांत जाधव 
सोमवार, 30 एप्रिल 2018

जळगाव ः केळीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रावेर तालुक्‍यातील केऱ्हाळे बुद्रुक येथील अतुल मधुकर पाटील यांनी गुलाबी बोंड अळीच्या चक्रव्यूहात देशी कापसाचे सरासरी उत्पादन साधले आहे. बोंड अळीमुळे जिल्ह्यातील इतर भागात पूर्वहंगामी कापसाचे क्षेत्र जानेवारीतच रिकामे करण्याची वेळ आली. पण अतुल यांच्या कापसाच्या पिकात अजूनही म्हणजेच एप्रिलच्या मध्यापर्यंत वेचणी सुरू आहे. लांब धाग्याचा गुणवत्तापूर्ण कापूस त्यांनी घेतला असून, त्याला दरही अधिक मिळतील, अशी स्थिती आहे. 

जळगाव ः केळीचे आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रावेर तालुक्‍यातील केऱ्हाळे बुद्रुक येथील अतुल मधुकर पाटील यांनी गुलाबी बोंड अळीच्या चक्रव्यूहात देशी कापसाचे सरासरी उत्पादन साधले आहे. बोंड अळीमुळे जिल्ह्यातील इतर भागात पूर्वहंगामी कापसाचे क्षेत्र जानेवारीतच रिकामे करण्याची वेळ आली. पण अतुल यांच्या कापसाच्या पिकात अजूनही म्हणजेच एप्रिलच्या मध्यापर्यंत वेचणी सुरू आहे. लांब धाग्याचा गुणवत्तापूर्ण कापूस त्यांनी घेतला असून, त्याला दरही अधिक मिळतील, अशी स्थिती आहे. 

अतुल यांच्याकडे ५० एकर शेती आहे. ते दरवर्षी १० एकरात कापसाची लागवड करतात. केळी घेऊन रिकाम्या झालेल्या क्षेत्रात बेवड म्हणून मागील आठ वर्षे कापसाच्या देशी सुधारित बियाण्याची लागवड ते करीत आहेत. यंदा पिंप्री शिवारात देशी सुधारित बियाण्याची १० एकरात लागवड केली होती. जमीन मध्यम स्वरूपाची आहे. पलटी नांगराने खोल नांगरणी करून नंतर जमीन भुसभुशीत केली होती. पाच बाय सव्वा फुटावर ९ जून २०१७ ला लागवड केली. इनलाइन ड्रीप सिंचनासाठी टाकली. 

लागवडीनंतर २५ दिवसांत एकरी एक गोणी डीएपी व एक गोणी २०.२६.२६ रासायनिक खत (बेसल डोस) दिले. नंतर बेसल डोस म्हणून ५० दिवसात एकरी २५ किलो युरिया व २५ किलो पोटॅश, १० किलो सल्फर, पाच किलो झिंक आणि पाच किलो फेरस दिले. नंतर डिसेंबरपर्यंत दर १८ दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये ड्रीपमधून दिली. तीनदा शेंडे खुडले. कारण वाढ जोमात होती. तरीही किमान आठ फुटांपर्यंत झाडांची वाढ झाली. 

नोव्हेंबरमध्ये वेचणी सुरू झाली. डिसेंबरमध्ये गुलाबी बोंड अळीचा किरकोळ प्रकोप होता. लागलीच प्रिव्हेंटीव कार्यक्रम राबवून फवारण्या घेतल्या. या अळीच्या प्रकोपात या भागातील इतर शेतकऱ्यांना बीटी कापसाचे पीक मोडावे लागले. पण अतुल यांचे कापसाचे पीक डिसेंबरमध्ये हिरवेगार दिसत होते. यामुळे या कापसाची फरदड (दुसरा बहार) घेण्याचा निर्णय अतुल यांनी घेतला. पहिल्या वेचणीला जेवढा कापूस आला नाही तेवढा नंतरच्या वेचणीला आला. जानेवारीच्या अखेरीस वेचणी सुरू झाली. १५ एप्रिल २०१८ पर्यंत वेचणी सुरू राहिली. 

एकरी १५ क्विंटल उत्पादन त्यांनी मिळविले आहे. कापसाचा दर्जा चांगला आहे. बोंडे व्यवस्थित उमलल्याने वेचणीला मजुरांना त्रास झाला नाही. किडका कापूस कुठे दिसत नाही. त्याचे प्रमाण सुमारे तीन टक्केच आहे. कापसाचा दर्जा चांगला असल्याने दरही चांगला मिळेल. अजून कापूस विकलेला नाही. या कापसाचे क्षेत्र रिकामे झाल्यानंतर त्यावर ऊतिसंवर्धित केळी रोपांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे, असे अतुल म्हणाले.

मी देशी कापसाचे उत्पादन मागील आठ वर्षे घेत आहे. केळीसाठी चांगले बेवड म्हणून देशी कापूस वाणांची लागवड करतो. यंदा उत्पादन बऱ्यापैकी आले. एकरी १८ ते १९ क्विंटल उत्पादन मी देशी कापसाचे घेतले आहे. यंदाही एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन हाती आले. बोंड अळीचे प्रमाण अतिशय कमी होते. 
- अतुल पाटील, कापूस उत्पादक, केऱ्हाळे बुद्रुक, 
ता. रावेर, जि. जळगाव

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...
ऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...
इथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...
‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...
विदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...
बचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....
कांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर  ः एकात्मिक फलोत्पादन विकास...
शेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...
महाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...
देशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...
देशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...
मराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...
सुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...
पाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...
राज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...
उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...
अकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...
विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेतमुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक...
प्रयत्नवादातून उभारलेला बेकर्स वेव्ह...वडगाव मावळ तालुक्यातील (जि. पुणे) दिवड येथील...