agriculture news in marathi, success story of a Grape Farmer, parner, satana, nashik | Agrowon

जिद्द द्राक्षबाग फुलवण्याची
दीपक खैरनार
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक ‘अर्ली’ हंगाम घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तालुक्यातील पारनेर हे गाव करंजांडी खोऱ्यात मोडते. येथील देवरे कुटुंबाने दर्जेदार द्राक्षे पिकवून त्यास किलोला १०० रुपये वा त्याहून अधिक दर मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
डाळिंबाची बाग नुकसानीत गेली तरी प्रयत्न न सोडता द्राक्षबाग उभारून त्यांनी जिद्दीचे दर्शन घडवले आहे.

नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक ‘अर्ली’ हंगाम घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तालुक्यातील पारनेर हे गाव करंजांडी खोऱ्यात मोडते. येथील देवरे कुटुंबाने दर्जेदार द्राक्षे पिकवून त्यास किलोला १०० रुपये वा त्याहून अधिक दर मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
डाळिंबाची बाग नुकसानीत गेली तरी प्रयत्न न सोडता द्राक्षबाग उभारून त्यांनी जिद्दीचे दर्शन घडवले आहे.

नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यात पारनेर हा भाग तालुक्यातील बहुतांशी दुष्काळी मानला जातो. द्राक्ष हेच या भागातील मुख्य पीक आहे. प्रतिकूल परिस्थितीतही या भागातील शेतकऱ्यांची वेगवेगळी पिके घेण्याची धडपड सुरू असते.

देवरे यांची द्राक्षशेती
गावातील अभिमन नथू देवरे यांची वडिलोपार्जित सुमारे सात एकर जमीन आहे. ते पूर्वी पारंपारिक पद्धतीने शेती करायचे. शेतीत मुलगा प्रदीप वडिलांना हातभार लावत असे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. पारंपरिक पद्धतीने शेती व्हायची. मात्र परिस्थितीत बदल करण्यासाठी शेती पद्धतीत बदल करणे गरजेचे असल्याचे देवरे यांना वाटायचे. काही वर्षांपूर्वी वडिलांचा विश्वास संपादन करून नव्या पिढीने शेतीची सूत्रे स्वीकारली.

डाळिंबाचा प्रयोग
सुरवातीला डाळिंबाची लागवड केली. या पिकाने चांगल्या प्रकारे साथही दिली. मात्र संपूर्ण कसमादे पट्ट्यात तेल्या, मर सारख्या रोगांचा प्रादुर्भाव हाताबाहेर जाऊ लागला. परिसरातील डाळिंबाच्या बागा नाहीशा होऊ लागल्या. देवरे यांच्याही बागेवर रोगाने आक्रमण केले. संपूर्ण बाग मुळासकट उपटून टाकण्यापलीकडे दुसरा मार्ग नव्हता. त्यानंतर एक ते दोन वर्षे पुन्हा पारंपरिक पद्धतीने पिके घेतली त्यानंतर मुलगा प्रदीप यांनी तीन ते चार वर्षांपूर्वी द्राक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला.

द्राक्षाची शेती
सुमारे सात एकर क्षेत्रांपैकी पाच एकर क्षेत्र द्राक्षशेतीला दिले आहे. यात थाॅमसन, एक एकर क्षेत्रात सोनाका व तीन एकर क्षेत्रात सुधाकर या जातींची लागवड केली आहे. लागवडीचे अंतर मुख्यतः ८ बाय ६ फूट ठेवले आहे. नियोजन करून एक जूनच्या सुमारास गोड्या छाटणीचे म्हणजे ‘अर्ली’ हंगामाचे नियोजन केले जाते. दरवर्षी साधारण सप्टेंबर १५ च्या दरम्यान द्राक्षे बाजारात येतात.
या वेळी बाजारात द्राक्षांची आवक मोठ्या प्रमाणात होत नसल्याने साहजिकच दरांचा फायदा घेता येतो.

जागेवरच मिळवले मार्केट
देवरे यांनी बांगलादेश, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली या बाजारपेठा मिळवल्या आहेत. व्यापाऱ्यांमार्फत या ठिकाणी मालाची विक्री केली जाते. डाळिंबाची बाग असल्यापासून व्यापारी जोडले असल्याने जागेवरच येऊनच शक्यतो मालाची खरेदी होते. यंदाही येत्या सप्टेंबरमध्ये माल काढणीस येईल. दरवर्षी किलोला १००, ११०, ११८ रुपये असे दर मिळवण्यात प्रदीप यशस्वी होतात. एकेवेळी रशियाला ९० रुपये प्रतिकिलो दरानेही त्यांनी व्यापाऱ्यांमार्फत माल निर्यात केला होता.
दरवर्षी एकरी एकरी आठ ते दहा टनांपर्यंत उत्पादन त्यांना मिळते. चढा दर मिळत असल्याने
एकरी पाच लाख रुपयांपर्यंत नफा मिळवण्याची संधी राहते.

नियोजनातील काही बाबी

  • पारनेर भागात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई राहते. ही समस्या लक्षात घेऊन डोंगराच्या पायथ्याशी शेततळे तयार केले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात बागा वाचवणे शक्य होते.
  • दोन विहिरी, पाच बोअरवेल्सची सुविधा केली. पैकी दोन बोअरवेल्सच्या आधारे शेततळे भरणे सुरू आहे. तर उर्वरित तीन बोअरवेल्सचा उपयोग विहिरीत पाणी साठवण्यासाठी होतो.
  • दरवर्षी मजुरबळाचे टेंडर दिले जाते. त्यासाठी एकरी ३० हजार रुपये दिले जातात. साधारण २० ते २५ मजूर येऊन अर्ली छाटणी करतात. या पद्धतीमुळे मजूरटंचाई कमी केली जाते.
  • द्राक्षाची गुणवत्ता जपण्यासाठी स्लरीचा वापर केला जातो. यात शेणखत, गोमूत्र,
  • गूळ, कडधान्याची स्लरी आदींचे मिश्रण भिजवून आठ दिवस ठेवले जाते. प्रत्येक झाडाला ती एक लिटर याप्रमाणे दिली जाते.

संपर्क- प्रदीप देवरे- ९४२१७७६६४२, ९८२२४४७२४५.

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर...पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला...
पडला सत्याचा दुष्काळ, बहू झाला घोळराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३...
चारा नियोजनातील ‘दुष्काळ’राज्यात आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे....
मोहोळमध्ये ‘हुमणी‘ने १७ हजार एकरांचे...मोहोळ, जि. सोलापूर : तालुक्‍यातील सात महसुली...
पॉलिथिन पिशव्यांचा वापर थांबविण्याचे...पुणे   : राज्यातील कृषी तसेच वन विभागातील...
ढगाळ हवामानामुळे थंडी गायब; आजही...पुणे : अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब...
तमिळनाडूच्या धर्तीवर मराठा समाजाला...मुंबई : मूळ आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या...
ब्लॉक प्रिंटिंग व्यवसायातून आर्थिक...पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा या जिल्ह्यांत...
दुष्काळग्रस्तांना सरसकट हेक्टरी ५० हजार...मुंबई : राज्यात यंदा १९७२ पेक्षाही भयंकर...
दूध अनुदान योजनेस ३१ जानेवारीपर्यंत...पुणे : राज्यात उत्पादित होणाऱ्या (पिशवी बंद...
आता कोठे धावे मन । तुझे चरण देखलिया...पंढरपूर, सोलापूर (प्रतिनिधी) :  आता कोठे...
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...