agriculture news in marathi, success story of Swati Ambade,Kurundwad,Dist.Kolhapur | Agrowon

स्वातीताईंच्या पदार्थांची परदेशातही ख्याती
राजकुमार चौगुले
रविवार, 6 जानेवारी 2019

कुरुंदवाड (ता. शिरोळ,जि. कोल्हापूर) येथील स्वाती आंबाडे यांनी विविध पदार्थ तयार करून परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ व्यावसायिक दृष्टी न ठेवता पदार्थांचा दर्जा आणि चव वाढवून विविध पदार्थांत हातखंडा मिळवला. त्यामुळे त्यांचे पदार्थ परदेशातही जाऊ लागले. इतर महिलांना रोजगार देत भविष्यात आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्याचे त्याचे ध्येय आहे.  
 

कुरुंदवाड (ता. शिरोळ,जि. कोल्हापूर) येथील स्वाती आंबाडे यांनी विविध पदार्थ तयार करून परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ व्यावसायिक दृष्टी न ठेवता पदार्थांचा दर्जा आणि चव वाढवून विविध पदार्थांत हातखंडा मिळवला. त्यामुळे त्यांचे पदार्थ परदेशातही जाऊ लागले. इतर महिलांना रोजगार देत भविष्यात आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्याचे त्याचे ध्येय आहे.  
 

कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड (ता. शिरोळ) येथील स्वाती संजय आंबाडे लग्न होऊन उच्चशिक्षित शेतकरी कुटुंबात आल्या. स्वाती ताईंचे माहेर इचलकरंजी. लग्नानंतर त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या कुटुंबाची आठ एकर शेती. पती संजय हे या भागातील प्रगतिशील शेतकरी. ऊस, भाजीपाला ही त्यांच्या कुटुंबाची मुख्य पिके. सगळी जमीन नदीच्या काठी असल्याने पुराचा धोकाही शेतीला असतो. पण वेगवेगळे प्रयोग राबवून आंबाडे कुटुंबीयांनी शेती फायदेशीर केली आहे. शेतीतून मिळणारे उत्पन्नच त्यांच्या दृष्टीने उदरनिर्वाहासाठी पुरेसे होते. परंतु स्वातीताइंना काही तरी वेगळे करून आपली ओळख निर्माण करण्याची इच्छा होती. घरच्यांच्या पाठिंब्यामुळे सुरवातीला त्यांनी सौंदर्यप्रसाधने, कपड्यांचा व्यवसाय केला. पण त्यात त्यांचे मन रमेना. स्वातीताई पाककलेत निपुण आसल्यामुळे यामध्येच आपण पूरक व्यवसाय का करू नये? असे त्यांना वाटले. म्हणून त्या नवीन खाद्य पदार्थ शिकल्या. कुरूंदवाड परिसरात सहकारी संस्थांचे मोठे जाळे आहे. या संस्थांच्या सभा व अन्य कार्यक्रमांना नाष्टा व जेवण पुरविण्यास त्यांनी प्रारंभ केला. यामध्ये गावरान थाळी, शेंगदाणा चटणी, पंजाबी थाळी आदी प्रकार ग्राहकांच्या पसंतीस उतरले. यातूनच त्यांच्या पदार्थांची यादी वाढत गेली.

साजूक तुपाचा वापर
केवळ व्यावसायिक दृष्टी न ठेवता पदार्थांचा रुचकरपणा ग्राहकांच्या जिभेवर राहावा यासाठी स्वातीताईंनी पदार्थांचा दर्जाकडे बारकाईने लक्ष दिले. बाजारातून तूप विकत न आणता ते थेट घरगुती स्वरुपातून गावातील महिलांकडून विकत घेतले. यामुळे गावातील महिलांना तर फायदा झालाच, पण स्वातीताईंनाही सकस तूपाची उपलब्धता झाली. बाकी चांगल्या दर्जाचा कच्चा माल त्यांनी स्थानिक ठिकाणाहून विकत आणून चविष्ट पदार्थ करण्यास सुरवात केली. घरगुती साजूक तुपामुळे पदार्थांचा दर्जा चांगला राहू लागला. चांगल्या चवीमुळे पदार्थांची मागणी वाढू लागली.  

महिलांना मिळाला रोजगार 
घराशेजारील जागेमध्ये पदार्थ बनविले जातात. सुमारे पंधरा महिला आठवड्यातील एक किंवा दोन दिवसाचा अपवाद वगळता दिवसभर पदार्थ तयार करत असतात. महिलांना तासिका तत्वावर मजूरी दिली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. यामुळे मोठी आर्डर आली तरी वेळेत हे पदार्थ तयार करण्यात महिला तत्पर असतात.

पदार्थांचा तयार केला ब्रॅण्ड

अर्हम फूड्‌स नावाने पदार्थांची विक्री केली जाते. काही व्यापारी घाऊक प्रमाणात पदार्थ घेऊन त्याचे स्वत: मार्केटिंग करतात. व्यापाऱ्यांकडून पदार्थांच्या चवी बाबतच्या सूचनाही तातडीने अंमलात आणल्या जातात. यामुळे आता स्वत: व्यापारी या पदार्थांची आर्डर देतात. वर्षाला दहा ते पंधरा लाख रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होते. सरासरी वीस टक्के नफा मिळत असल्याचे स्वातीताई सांगतात. त्यांना भविष्यात कुरुंदवाड मध्ये खास महिलांनी उभारलेले एक शाकाहारी हॉटेल सुरू करायचे आहे.  संपूर्ण व्यवसायामध्ये त्यांना माधवी दातार तसेच त्यांच्या सासूबाई शशिकला, पती संजय आणि मुलगा सुजल हे मदत करतात. त्यांच्या मदतीमुळेच आपण हे यश मिळवू शकलो असे स्वातीताई सांगतात. 

लाडूंमध्ये हातखंडा

विविध प्रकारचे लाडू हे स्वातीताईंच्या पाककलेचे वैशिष्ट्य. त्यांच्याकडे हळीव लाडू, हिरव्या मुगाचे लाडू, शेंगदाणा लाडू, बाजरी लाडू, शेंगोळी लाडू, गुळातील डिंक लाडू, मल्टिग्रेन लाडू आदि प्रकारचे लाडू मिळतात. खवा, ज्वारी आणि खारीक वापरुन  तीन थराचे लाडू हा त्यांचा स्पेशल मेनू आहे. 
याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे नमकीनही बनवले जातात. यामध्ये मेथी नमकीन मध्ये चार स्वाद आहेत. चटपटा चिली, चीज, गार्लिक, टॅंगी टोमॅटो, सॉल्टेड आदि प्रकारात नमकीन बनविले जाते. २०० ग्रॅम पासून एक किलोपर्यंत पदार्थांचे पॅकींग होते. लाडूचे दर प्रकारानुसार किलोसाठी २६० ते ५०० रुपये तर शेंगदाणे चटणीचा दर ३०० रुपये किलो असा आहे. 
 

दर्जेदार चवीने मिळविले मार्केट
माऊथ टू माऊथ पब्लीसीटी हे सूत्र त्यांनी अंगिकारून व्यवसाय सुरू केला. चांगले पदार्थ दिले की एक व्यक्ती दुसऱ्याला सांगत जाते असे गृहीतक धरून त्यांनी व्यवसायास प्रारंभ केला. काही महोत्सवामध्ये स्टॉल लावून त्यांनी राज्यभरातील ग्राहकांची पसंती मिळविली. सध्या पुण्याबरोबर कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा जिल्ह्यातून त्यांच्या पदार्थांना चांगली मागणी आहे.

दिवाळीसाठी चोवीस प्रकारचे पदार्थ 
दिवाळी सणामध्ये स्वातीताईंना थोडीही उसंत नसते. नेहमीच्या पदार्थाबरोबर दिवाळीच्या फराळाचे सर्व पदार्थ त्या साजूक तूपामध्ये करतात. यामुळे या कालावधीत पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या कालावधीत जवळ जवळ २४ प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. या भागात दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. 

परदेशातही मागणी
स्वातीताईंनी तयार केलेले पदार्थ घरगुती तुपामध्ये केलेले असल्यामुळे त्याचा टिकाऊपणा बाजारात मिळणाऱ्या इतर पदार्थांच्या तुलनेत जास्त आहे. शेंगदाणा पोळी आणि डिंक लाडूला परदेशातील ग्राहकांकडून जास्त मागणी असते. नागरिक, विद्यार्थी जास्त प्रमाणात हे पदार्थ घेऊन परदेशात जातात. हा अभिमानाचा क्षण असल्याचे स्वातीताई सांगतात. 

विविध स्पर्धांमध्ये यश 
पदार्थांचा दर्जेदारपणा हे स्वातीताईंच्या यशाचे मुळ आहे. याच जोरावर त्यांनी पाककलेच्या अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय श्रावण महोत्सव स्पर्धेत महाराष्ट्राची किचन क्विन या विभागात त्या उपविजेत्या ठरल्या. सहभागी तब्बल १५०० स्पर्धकांमधून त्या उपविजेत्या बनल्या. जेष्ठ उद्योजक विठ्ठल कामत आणि सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी परीक्षण करून त्यांच्या पदार्थांना दाद दिली आहे. 

-  स्वाती आंबाडे, ७२१८९५५१८९

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
‘रेसिड्यू फ्री’ शेतीतून गुणवत्ताप्राप्त...स्थावर मालमत्ता व्यावसायिक उद्योगातील दोन...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...
ताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...
अवीट  गोडीच्या मेहरुणी बोरांनी दिला...खानदेशची अवीट गोडीची व आरोग्यवर्धक मेहरुणी बोरे...
काळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...
सांगलीची `शिवाजी मंडई' शेतकऱ्यांसाठी...सांगली शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी...
शेतीला दिली गव्हांकुर निर्मितीची जोडजारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा...
निवृत्त भूजल शास्त्रज्ञ झाला प्रयोगशील...भूजल शास्त्रज्ञ पदावरून निवृत्त झालेले ओमप्रकाश...
काळ्या द्राक्षांच्या शेतीत तोडकरांचा...सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील तोडकर बंधूंनी...
दर्जेदार ‘अर्ली’ द्राक्ष उत्पादनात...नाशिक जिल्ह्यात देवळा, सटाणा भाग ‘अर्ली’ (आगाप)...
संरक्षित शेतीने आर्थिक पाया केला भक्कमदुष्काळाशी तोंड देणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील...
आधुनिक तंत्र, बारमाही भाजीपाला शेतीकडे पाहण्याचा व्यावसायिक दृष्टीकोन, शेतीत...
काळानुसार नवी पिके हेच गमक यशाचे दुष्काळ, पाणीटंचाई, बाजारपेठेतील विविध शेतमालांना...
यांत्रिकीकरणातून यशस्वी भातशेतीभाताचे कोठार असलेल्या मावळ तालुक्यात यंदा पावसाने...
स्वातीताईंच्या पदार्थांची परदेशातही...कुरुंदवाड (ता. शिरोळ,जि. कोल्हापूर) येथील स्वाती...
महिलांना स्वयंपूर्ण करणारी ‘निरजा'संगमनेर (जि. नगर) येथील अपर्णा देशमुख यांनी...
दुष्काळात कामी आले बहुविध पीक पद्धतीतील... नगर जिल्ह्यातील दिघी (ता. कर्जत) येथील शेतकरी...