संत्रा पिकातील सिट्रीस ग्रिनिंग नियंत्रण तंत्रज्ञानाचा शोध यशस्वी

संत्रा पिकातील सिट्रीस ग्रिनिंग नियंत्रण तंत्रज्ञानाचा शोध यशस्वी
संत्रा पिकातील सिट्रीस ग्रिनिंग नियंत्रण तंत्रज्ञानाचा शोध यशस्वी

नागपूर : जागतिकस्तरावर संत्रा पिकात अतिशय गंभीर समजलेल्या गेलेल्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून निदान न होऊ शकलेल्या संत्रा ग्रीनिंग या रोगाच्या नियंत्रणात ९७ टक्‍केपर्यंत यश आल्याचा दावा केंद्रीय लिंबूवर्गीय संस्थेकडून करण्यात आला आहे. आय.आय.टी. रुरकी, युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल फ्लोरीडा (अमेरिका) आणि केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर यांच्या संयुक्‍त संशोधनातून हे शक्‍य झाल्याचे डॉ. मिलिंद लदानिया यांनी गुरुवारी (ता. १७) पत्रपरिषदेत सांगितले.   सिट्रस निला या कीटकापासून माध्यमातून सिट्रस ग्रीनिंगचा प्रादुर्भाव होतो. झाडावर नवीन नवती आल्यानंतर सिट्रस निला त्यातील रसशोषणाकरिता येते. त्या वेळी सिट्रस निलाच्या नियंत्रणाची गरज राहते. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास झाडांची पाने गळून पडतात. शेंड्यापासून झाड वाळून ती मरतात. याला कधीकाळी त्यामुळेच डायबॅक असेही म्हटले जात होते. दर्जेदार रोपांचा पुरवठा न होणे हे देखील सिट्रीस ग्रिनिंगच्या प्रादुर्भावामागील कारण असल्याचे डॉ. लदानिया यांनी सांगीतले. सिट्रस ग्रिनिंगच्या नियंत्रणासाठी जागतिकस्तरावर अनेक संशोधन संस्था काम करीत आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांत त्यात अपेक्षित यश आले नाही. दरम्यान आय.आय.टी. रुडकी, फ्लोरीडा विद्यापीठ आणि सीसीआरआय यांच्या संयुक्‍त संशोधनातून २ एस एब्ल्युमिन प्रोटीन शोधून काढण्यात आला आहे.  जो कोहळा (पम्पकिन, कुकरबिटा मॅक्‍सिमा) च्या बियाण्यांपासून प्राप्त झाला आहे. २ एस.डब्ल्युमिन आणि आणि नॅनो झिंक ऑक्‍साईड (नॅनो-झेडएनओ) यांचे संयुक्‍त द्रावणाचा वापर करीत झाडातील रोगाचे प्रमाण ९७ टक्‍केपर्यंत कमी झाल्याचे निरीक्षण गेल्या तीन वर्षांतील संशोधनातून समोर आले आहे. 

अशी आहे प्रक्रिया सिट्रस ग्रीनिंग प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या खोडाला आधी ड्रिलच्या साह्याने छिद्र केले जाते. त्यानंतर त्यामध्ये २ एस.डब्ल्युमिन आणि आणि नॅनो झिंक ऑक्‍साईड (नॅनो-झेडएनओ) यांचे द्रावण इंजेक्‍सशनच्या माध्यमातून सोडले जाते. डॉ. अश्‍वीनी कुमार, डॉ. दिलीप घोष, डॉ. एस.एम. सॅंट्रा, डॉ. मिलिंद लदानिया यांचा या संशोधन कार्यात सहभाग होता. अमेरिकन पेटंटकरिता या संशोधनाची शिफारस करण्यात आली आहे. लवकरच प्रत्यक्ष शेतीत याचा वापर होणार असून खासगी कंपनीच्या माध्यमातून या औषधाचा पुरवठा केला जाईल, असेही डॉ. मिलिंद लदानिया यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com