agriculture news in marathi, sugar beet canbe added to sugarcane juice | Agrowon

ऊसरसात शर्कराकंदाचे मिश्रण शक्य
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप हंगाम वाढविण्यासाठी भविष्यात ऊसरसात शर्कराकंदाचे २० टक्के मिश्रण करून दर्जेदार साखरनिर्मिती शक्य आहे. तसेच या कंदापासून थेट इथेनॉलदेखील करता येईल, अशी माहिती व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी दिली.  

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा घटलेला गाळप हंगाम वाढविण्यासाठी भविष्यात ऊसरसात शर्कराकंदाचे २० टक्के मिश्रण करून दर्जेदार साखरनिर्मिती शक्य आहे. तसेच या कंदापासून थेट इथेनॉलदेखील करता येईल, अशी माहिती व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी दिली.  

व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार यांच्‍या नेतृत्वाखाली अलीकडेच शास्त्रज्ञांनी युरोप दोरा करून शर्कराकंदापासून साखर उत्पादनाची माहिती घेतली. गेल्या दहा वर्षांपासून कंदावर सुरू असलेल्या व्हीएसआयच्या चाचण्या यशस्वी ठरत आहेत. यापूर्वी राज्यात समर्थ आणि सर्वोदय साखर कारखान्यात शर्कराकंदाच्या चाचण्या घेतल्या गेल्या. आता बारामती अॅग्रो युनिटमध्ये चाचण्या होणार आहेत. पाणीटंचाईमुळे पाणी बचत करणाऱ्या शर्कराकंदाकडे आता कारखान्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

युरोपात शर्कराकंद पीक तीन हंगामात घेतात. तेथे प्रतिएकर उत्पादन ३५ टन आणि साखर उताराही चांगला मिळतो. याशिवाय इथेनॉल, चारा म्हणून शर्कराकंदाचा उपयोग केला जातो. राज्यात मात्र शर्कराकंद हा उसाला भक्कम पर्याय होऊ शकत नाही. तरीही शर्कराकंद रसाचे मिश्रण ऊसरसात करता येईल. त्यासाठी कारखान्यांना डिफ्युजर, स्लायसर बसवावे लागतील. 

"राज्यात शर्कराकंदाचे उत्पादन फक्त हिवाळ्यात घेता येईल. पीक सहा महिन्यांचे असून एप्रिलमध्ये गाळपाला ऊस संपत आलेला असतानाचा शर्कराकंदाचे पीक हाताशी मिळते. त्यापासून ऊसरसात २० टक्के मिश्रण होऊ शकते. थेट इथेनॉलदेखील करता येईल. शर्कराकंद ५ किलोपर्यंत मिळत असला तरी अडीच किलोच्या कंदात जास्त साखर सापडते. या पिकामुळे ऊसशेतीत ५० टक्के पाणी बचत होईल," असे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.  
 

शर्कराकंदाच्या लागवड खर्चाचा अभ्यास झाला आहे. उसापेक्षाही कंदाचे पीक परवडते. पंजाबमध्ये राणा शुगरने ८ हजार एकरवर कंद लावला आहे. त्याच धर्तीवर राज्यात देखील शर्कराकंद लागवडीला प्रोत्साहन देता येईल. त्यामुळे पाणी बचत होते. क्षारपड जमिनीतही पीक चांगले येते.
- विकास देशमुख, संचालक, व्हीएसआय

इतर अॅग्रो विशेष
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...