agriculture news in marathi, sugar commissioner gives order to paid farmers money first, solapur, maharashtra | Agrowon

`शेतकऱ्यांची देणी आधी द्या; मगच गाळप परवाना`
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

सोलापूर  : ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची संपूर्ण थकीत देणी अदा केल्याशिवाय कारखान्यांना यंदा गाळप परवाना देता येणार नाही, अशी भूमिका राज्याचे साखर आयुक्त संभाजीराव कडू पाटील यांनी घेतली आहे. पण अद्यापपर्यंत कारखानदारांनी घेतलेली भूमिका, कारखानदार त्यांना कितपत दाद देतील, याबाबत शंकाच आहे.

सोलापूर  : ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची संपूर्ण थकीत देणी अदा केल्याशिवाय कारखान्यांना यंदा गाळप परवाना देता येणार नाही, अशी भूमिका राज्याचे साखर आयुक्त संभाजीराव कडू पाटील यांनी घेतली आहे. पण अद्यापपर्यंत कारखानदारांनी घेतलेली भूमिका, कारखानदार त्यांना कितपत दाद देतील, याबाबत शंकाच आहे.

गतवर्षी साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. परंतु शेतकऱ्यांनी गाळपासाठी दिलेल्या उसाच्या रकमा काही कारखान्यांनी अद्यापपर्यंत दिल्या नाहीत. सहकार खात्याने या कारखान्यांना नेहमीच मुदतवाढ देत अभय दिल्याची भावना ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे. सहकारमंत्री आणि सहकार खाते या कारखानदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे.

विशेषत: सोलापूर जिल्ह्यातील जवळपास १२ साखर कारखान्यांनी गतवर्षीच्या ऊसबिलाची अंतिम रक्कम दिलेली नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख याच जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह काही शेतकरी संघटनांनी सहकारमंत्र्यांना लक्ष्य करीत त्यांच्या घरावर मोर्चे काढले आंदोलने केली. पण दोन महिन्यांपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा असंतोष सातत्याने उफाळून येत आहे. गतवर्षीच्या उसाची रक्कम दिल्याशिवाय साखर कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा संघटनांनी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे.

सहकारमंत्र्यांनी आधी ५ सप्टेंबर नंतर १५ सप्टेंबरची मुदत साखर कारखानदारांना दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे साखर आयुक्त संभाजीराव कडू- पाटील यांनी नवीन परिपत्रक जारी केले आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीचा हवाला देत सर्व थकीत देणी दिल्याशिवाय परवाना देणार नसल्याचे सांगितले आहे.

इतर अॅग्रो विशेष
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...
चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची...
जेजुरीत कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची...जेजुरी, जि. पुणे : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त...
नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेती, गावतळे, जलसंपदा,...
राज्यात थंडीत चढउतारपुणे : छत्तीसगडचा दक्षिण भाग, तेलंगणा आणि...
दोन टप्प्यांत ‘एफआरपी’ला विरोधसातारा : साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता...
पीककर्जासाठी उपोषणकर्त्या शेतकऱ्याचे...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
कांदाप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडून आढावानाशिक : हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक...
केळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...
वालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...
मका भुशाला तीन हजारांचा भावजायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प...
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू...
कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन...पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात...
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब ...मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...
जपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...