agriculture news in marathi, Sugar commissioner sanctioned RRC notice to factories not giving FRP | Agrowon

सत्तर कारखान्यांना बजावली 'आरआरसी'
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

साखर आयुक्तालयाचा सतत पाठपुरावा आणि साखर कारखान्यांच्या समन्वयाच्या भूमिकेतून राज्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत एफआरपीपोटी आतापर्यंत १९ हजार ५०० कोटी रुपये जमा करण्यात यश आलेले आहे. देय एफआरपीच्या ८८ टक्के रक्कम शेतकऱ्यांना अदा झाली आहे. उर्वरित रक्कम मिळवून देण्यासाठी आमचा सतत पाठपुरावा सुरू आहे.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त

पुणे : राज्यातील १९५ साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून देण्यात साखर आयुक्तालयाने यंदा दणकेबाज पाठपुरावा केला आहे. आतापर्यंत १९ हजार ५०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत जमा करण्यास भाग पाडले गेले असून, एफआरपी थकविणाऱ्या ७० कारखान्यांवर आरआरसी (महसुली वसुली प्रमाणपत्र)  कारवाई केली आहे.

“१९५ कारखान्यांनी यंदा ९५२ लाख टन उसाचे गाळप केले. राज्यात कुठेही ऊस शिल्लक राहिला नाही. गाळपाच्या शेवटच्या टप्प्यात ‘विघ्नहर’ कारखान्याने ६ मे रोजी बॉयलर बंद करून हंगामाचा शेवट केला आहे. एफआरपीपोटी यंदा शेतकऱ्यांना २२ हजार १७२ कोटी रुपये अदा करण्याची जबाबदारी कारखान्यांवर होती. त्यापैकी ८८ टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यांत वर्ग झाली आहे,” असे साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

राज्यात ५१ कारखान्यांनी यंदा १०० टक्के एफआरपी अदा केली आहे. ८० ते ९९ टक्के एफआरपी देण्यात जवळपास ८५ कारखान्यांना यश आले. ६० ते ७९ टक्के एफआरपी दिलेल्या कारखान्यांची संख्या ३६ आहे. 

“एफआरपी वाटपातील घडामोडी बघता अजून १२ टक्के एफआरपी थकीत दिसते आहे. ही रक्कम अंदाजे दोन हजार ९४२ कोटी रुपयांच्या आसपास आहे. थकीत एफआरपी मिळवून देण्यासाठी आम्ही सर्व स्तरांवरून प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे अजून किमान पाच टक्के रक्कम येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यांत वर्ग होण्याची शक्यता वाटते. त्यानंतर मात्र थकीत एफआरपी ५-७ टक्क्यांच्या आसपास राहील, असा अंदाज साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला.

दरम्यान, एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांना यंदा कारवाईच्या कक्षेत यंदा झपाट्याने आणले गेले आहे. त्यामुळे आरआरसी (महसुली वसुली प्रमाणपत्र) केलेल्या कारखान्यांची संख्या महिनाभरात ४५ वरून ७० वर आली आहे. 
आरआरसी कारवाईमुळे जिल्हाधिकाऱ्यांना साखर कारखान्याची मालमत्ता जप्त करून एफआरपी वसुलीचा अधिकार मिळतो. या माध्यमातून किमान दोन हजार कोटी रुपयांच्या आसपास रक्कम शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे.
एफआरपी थकविणाऱ्या साखर कारखान्यांची एकूण संख्या १४४ आहे. त्यापैकी २३ कारखान्यांनी ६० टक्क्यांच्या वर एफआरपी थकविली आहे. “एफआरपी मिळवून देण्यासाठी याच २३ कारखान्यांकडे प्रशासनाला जास्त पाठपुरावा करावा लागेल,” असे साखर उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची कूर्मगतीराज्यात दोन आठवड्याने उशिरा मॉन्सून दाखल झाला...
सोयीनुसार निवडणूक घेण्याचे ढोंग कशाला?देशापुढील वास्तव संकटे, समस्या अग्रक्रमाने...
मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पाऊसऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यामध्ये रविवारी (...
पीकविम्यातील हलगर्जीपणा; कृषी...पुणे : प्रधानमंत्री पीकविमा योजनेची कामे करताना...
मॉन्सूनने निम्मा महाराष्ट्र व्यापलापुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यतापुणे : राज्याच्या दक्षिण भागात मॉन्सूनने आगमन...
औरंगाबाद, कोपरगाव, येवल्यात धोधो पाऊसपुणे : कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील...
`गुणनियंत्रण`चा चेंडू आता ‘एसीबी’च्या...पुणे : राज्याच्या कृषी विभागातील गुणनियंत्रण...
आटपाडीत पावसाने पाणीपातळीत वाढसांगली : आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागात दोन...
मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरीऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषदनाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे...
राज्यात चार वर्षांत १२ हजार...मुंबई  : शेतकऱ्यांना सुखी करण्याचे...
योग्य ओलाव्यावर करा पेरणी बाजरी बाजरी पिकाकरिता पाण्याचा उत्तम निचरा...
प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखअमरावती येथील जयश्री रवींद्र गुंबळे यांनी गेल्या...
ग्रामविकास, आरोग्य अन् शिक्षणासाठी ‘खोज...मेळघाट परिसरातील आदिवासी लोकांच्या विकासासाठी...
मॉन्सून मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य...पुणे  : राज्यात दाखल होताच नैर्ऋत्य मोसमी...
मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वेगाने...
पाणीवापर संस्थांनी वाढवावी कार्यक्षमता सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या इतिहासाची माहिती...
पत्रास कारण की ...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व...
दुग्धव्यवसाय, प्रक्रियेने दिला शेताीला...बुलडाणा शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवरील अजिसपूर...