साखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावले

साखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावले
साखर मूल्यांकन घटीने कारखानदार धास्तावले

कोल्हापूर : साखरेला उठाव नसल्याने साखर कारखान्यांना एफआरपी इतकी रक्कम देणे अशक्‍य बनलेले असतानाच आता राज्य बॅंकेने पुन्हा बाँबगोळा टाकला आहे. राज्य बॅंकेने साखर मूल्यांकनात १०० रुपयांची घट केल्याने आता कारखानदारीपुढे नव्याने संकट उभे राहिले आहे. एकरकमी एफआरपी देणे अशक्‍य असल्याचे कारखानदारांकडून बोलले जात आहे. यातच राज्य बॅंकेने मूल्यांकनात घट केली. परिणामी एकरकमी एफआरपीची शक्‍यता आणखी धूसर होण्याची चिन्हे आहेत.  दोन दिवसांपूर्वी राज्य बॅंकेने बाजारातील साखर दराचा अंदाज घेऊन मूल्यांकनात बदल केले. बॅंकेने कारखान्यांना पाठविलेल्या नव्या पत्रानुसार अगोदर गृहित धरलेली ३१०० रुपयांची साखरेची किंमत आता ३००० रुपये धरण्यात आली आहे. यानुसारच आता साखर कारखान्यांना साखर पोत्यावरची उचल मिळणार आहे. म्हणजे गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत ही उचल शंभर रुपयांनी घटणार आहे. साखर पोत्याला आता ३१०० च्या ८५ टक्के म्हणजे २६३५ रुपयांच्या आसपास रक्कम मिळेल. प्रक्रिया खर्च वजा जाता ऊस उत्पादकांना देण्यासाठी टनाला निव्वळ १८०० रुपयांच्या आसपास रक्कम कारखान्यांना मिळेल. एफआरपी देण्याकरिता वरील सर्व रकमेची तरतूद कारखान्यांना करावी लागणार आहे. एकरक्कमी एफआरपी देण्यासही असमर्थता व्यक्त करणाऱ्या कारखान्यांना हा नव्याने धक्का असल्याने आता कारखानदार पुरते वैतागल्याचे चित्र साखरपट्ट्यात आहे. यामुळे कोणत्याही क्षणी एखादा कारखाना एफआरपीची काही रक्कमच शेतकऱ्यांना देण्याची शक्‍यता आहे. दक्षिण महाराष्ट्रातील काही नामवंत कारखान्यांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार कारखादारीची व्यथा सरकारकडून गांभिर्याने घेतली जात नसल्याचे सध्याचे चित्र आहे. साखरेची बाजारात केविलवाणी अवस्था होत आहे. यामुळे हंगाम सुरू होऊनही आम्हाला दराचा दबाव झेलावा लागत आहे. सध्या तरी कोणत्याही परिस्थितीत एकरकमी एफआरपी शक्‍य नसल्याचे कारखानदारांनी सांगितले. पण अशी रक्कम जमा केल्यास संबंधित कारखान्याकडे टीकेचा सूर वळणार असल्याने कारखानदार शांत आहेत. 

यंदाच्या ऊस दराची कोंडी कोल्हापुरात फुटली. कोल्हापुरातील साखर कारखान्यांनी एफआरपी एकरकमी देण्याचे मान्य केले. यानंतर अवघ्या काही तासांतच हाच फॉर्म्युला सांगलीतील कारखान्यांनीही मान्य केला. आता सांगलीचे कारखानदार कोल्हापूरकडे लक्ष देऊन आहेत. कोल्हापूरच्या कारखान्यांनी पहिल्या हप्त्याची रककम जमा करावी, अशी त्यांची अपेक्षा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अद्यापही किती रक्कम शेतकऱ्यांच्या नावावर जमा करायची, याबाबत एकमत होत नसल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com