साखर मूल्यांकनात १३० रुपयांनी वाढ

साखर मूल्यांकनात १३० रुपयांनी वाढ
साखर मूल्यांकनात १३० रुपयांनी वाढ

कोल्हापूर : साखर दरात वाढ होत असल्याने त्याचा अनुकूल परिणाम साखरेच्या मूल्यांकनवाढीवर झाला आहे.  साखरेच्या दरात चारशे रुपयांची वाढ होत असल्याने राज्य बॅंकेनेही मूल्यांकनात १३० रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे आता कारखान्यांना पहिला हप्ता देण्याच्या अडचणी कमी झाल्या आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात राज्य बॅंकेने साखरेचे मूल्यांकन क्विंटलला २९७० रुपये केले होते. आता नव्या वाढीनुसार यात १३० रुपयांनी वाढ करून ते ३१०० रुपये केले आहे. यामुळे साखर उद्योगात उत्साह आहे. याचा सकारात्मक परिणाम रखडलेली पहिले बिले देण्यावर होणार आहे.    पंधरवड्यापूर्वी काही कारखान्यांनी हंगामाच्या सुरवातीला जाहीर केलेल्या हप्त्यात टनास ५०० रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. आता बाजारात साखरेचे वाढलेले दर व राज्य बॅंकेनेही मूल्यांकनात वाढ केल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील कारखाने जाहीर केलेला ३००० रुपयापर्यंतचा पहिला हप्ता देऊ शकतील, अशी शक्‍यता आहे. अद्याप कोणत्याही कारखान्यांनी याची वाच्यता केली नसली, तरी ५०० रुपये कपातीचा निर्णय मागे घेण्याबाबतच्या चर्चा कारखानदारांतून सुरू आहेत.   केंद्र सरकारने आयात शुल्क शंभर टक्के केले त्यातच कारखान्यांच्या विक्रीवरही मर्यादा आणली. या दोन निर्णयांच्या चर्चेचा परिणाम प्रत्यक्ष साखर बाजारात झाला. आता बाहेरून साखर येणे अशक्‍य असल्याने व बाजारातही पूर्ण क्षमतेने साखर उपलब्ध होणार नसल्याची शक्‍यता निर्माण झाल्याने साखर बाजार वधारला. दहा फेब्रुवारीपूर्वी २८०० रुपयांपर्यंत रेंगाळणाऱ्या दराने गेल्या दहा दिवसांत ३२०० रुपयांपर्यंत उच्चांकी झेप घेतली. यामुळे कारखानदारांत यंदा पहिल्यांदाच हास्य पसरले आहे. अशी मिळणार कारखान्यांना रक्कम राज्य बँकेने साखरेची रक्कम ३१०० रुपये गृहीत धरली आहे. या रकमेच्या ८५ टक्के उचल लक्ष्यात घेता राज्य बँक कारखान्यांना २६३५ रुपये उचल देईल. इतर खर्च वगळता कारखान्यांना ऊस उत्पादकांसाठी १८८५ रुपये उपलब्ध होणार आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com