यंदाच्या हंगामात साखर निर्यात अशक्‍य ?

यंदाच्या हंगामात साखर निर्यात अशक्‍य ?
यंदाच्या हंगामात साखर निर्यात अशक्‍य ?

कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यांपासून साखरेच्या दरात घसरण सुरू असल्याने साखर कारखानदार अस्वस्थ झाले आहेत. सध्या तरी केंद्राने काही तरी ठोस आणि विशेष पॅकेज दिल्याशिवाय निर्यातीची सुतराम शक्‍यता नसल्याचे या उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.  देशांतर्गत बाजारात साखरेचे दर ३००० रुपयांच्या आसपास आहेत. तर आंतराष्ट्रीय बाजारात तर हे दर २२०० रुपयांपर्यंत असल्याने निर्यातीची सुतराम शक्‍यता नाही. यंदाच्या हंगामात जेवढी मागणी तितकेच उत्पादन अपेक्षित आहे. यामुळे यंदा तातडीने साखर कारखाने साखर निर्यात करण्याची शक्‍यता धूसर आहे.

कारखान्यांच्या स्पर्धेतूनच बिघडतेय गणित खरे तर एकमेकांच्या स्पर्धेतून साखरेच्या दराचे गणित बिघडत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या उत्तर प्रदेशातून साखरेचे चांगले उत्पादन होते. त्या तुलनेत महाराष्ट्रातून कमी आहे. साखरेचे दर घसरत चालले याचा ओरडा सुरू आहे; पण कारखाना पातळीवरूनही एकी नसल्याने कोणाचेच कोणाला पडले नसल्याची सध्याची स्थिती आहे. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी साखरेचे दर चांगले होते; पण सोलापूर, मराठवाडा भागांतील साखर कारखान्यांची स्थिती फारशी चांगली नसल्याने या भागातील कारखान्यांनी मिळेल त्या दराला साखर विकली. यामुळे या दराचा प्रभाव पश्‍चिम महाराष्टातील कारखान्यांवर पडला. यामुळे साखरेचा तातडीने उठाव व्हावा, यासाठी या कारखान्यांनाही कमी किमतीत साखर विकावी लागली. यामुळे अर्थकारण बिघडले.  खासगी विरुद्ध सहकारी स्पर्धा तीव्र साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी काही कारखानदार एकीचा प्रयत्न करतात. ठराविक रकमेच्या खालील दरात साखर विकायची नाही असे ठरवतात. पण ही एकी कायम राहत नाही. खासगी विरुद्ध सहकारी कारखान्यांतील स्पर्धा तीव्र होऊन यातीलच काही कारखाने निर्णयाला हरताळ फासत, कमी किमतीने साखर विकून साऱ्या अपेक्षांना सुरुंग लावत असल्याची जळजळीत प्रतिक्रिया एका कारखानदाराने व्यक्त केली. आमच्या आमच्यातील स्पर्धा सर्व उद्योगालाच अडचणीत आणत असल्याची खंत कारखाना प्रतिनिधीने व्यक्त केले. 

व्यापाऱ्यांवर दबाव शक्‍य कारखान्यांनी ठराविक रकमेच्या खाली साखर विकायची नाही, असे एकत्रित ठरविल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दराची घसरण कमी होण्यावर होऊ शकतो, असे काही व्यापारी प्रतिनिधींनीच कबूल केले. व्यापाऱ्यांना चक्र चालवायचे असते. यामुळे काही काळ वाट बघून ते ठराविक किंमतीपर्यंत साखर खरेदी करू शकतात, असे या व्यापाऱ्याने सांगितले.

निर्यात आवश्यक निर्यातीतून फारसा नफा कारखान्यांना अलीकडच्या काळात मिळेनासा झाला आहे, पण जर निर्यात झाल्यास देशातील अतिरिक्त साठा कमी होऊन त्याचा फायदा देशांतर्गत दर वाढण्यावर होऊ शकतो. यामुळे निर्यात आवश्‍यक असल्याचे मत अनेक कारखानदारांचे आहे. स्थानिक व देशाबाहेरील बाजारपेठांचा दर जवळपासही फिरकत नसल्याने विशेष पॅकेज केंद्राने दिले तरच साखर निर्यात शक्‍य असल्याचे या उद्योगतील तज्ज्ञांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com