agriculture news in marathi, sugar export planning, pune, maharashtra | Agrowon

साखर निर्यात नियोजनासाठी कारखाने, निर्यातदार एकत्र
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

निर्यात चांगल्या प्रमाणात करण्यासाठी सर्वंच कारखान्यांना प्रयत्न करावेत लागतील. मात्र, निर्यातीमधील काही अडचणी व त्यावरील उपाययोजनांसाठी सर्व कारखान्यांनी निर्यातदारांसह एकत्र येण्याची आवश्यकता भासते आहे. त्यामुळे या बैठकीनंतर निर्यातीला चालना मिळण्याची शक्यता आहे.
- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघ.

पुणे   ः ऊस गाळप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवस बाकी असताना साखर निर्यातीच्या नियोजनासाठी कारखान्यांची धावपळ सुरू झाली आहे. राज्यातील सर्व कारखाने आता निर्यातदारांसह एकत्र येऊन नियोजन करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघ, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ, ईस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन; तसेच राज्यातील साखर निर्यातदार या बैठकीत सहभागी होणार आहेत. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार या बैठकीला उपस्थित राहून वस्तुस्थिती जाणून घेणार आहेत. त्यानंतर निर्यातीबाबत साखर उद्योगाच्या वतीने अंतिम भूमिका श्री. पवार स्पष्ट करतील.

‘‘राज्य सरकारने येत्या १५ ऑक्‍टोबरपासून ऊस गाळप हंगामाला सुरवात करण्याचे यापूर्वीच घोषित केले आहे. मात्र,  बहुसंख्य कारखान्यांकडे असलेला साखरेचा साठा आणि आगामी हंगामातदेखील तयार होणारी भरपूर साखर लक्षात घेता जास्तीत जास्त निर्यात झाल्याशिवाय कारखान्यांना समस्येतून बाहेर पडता येणार नाही, असा निष्कर्ष साखर उद्योगाने काढलेला आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.

साखरेचा साठा कमी होत नाही, तोपर्यंत कारखान्यांच्या अडचणी संपणार नाहीत. त्यामुळेच निर्यातवाढीसाठी सर्वांना प्रयत्न करावे लागतील, असा सल्ला श्री. पवार यांनी साखर संघाच्या सभेत सहकारी साखर कारखान्यांना यापूर्वीच दिलेला आहे. त्यामुळे शनिवारी (ता.१३) मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
सोलापूर जिल्ह्यातील ‘दुष्काळ`...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून...
निवडणूक अायोगाच्या बोधचिन्हाची मानवी...बुलडाणा : येथील जिजामाता प्रेक्षागारात पाच हजार...
ऊसदर नियामक मंडळाची ‘आरएसएफ’प्रश्नी...पुणे : राज्यातील काही साखर कारखान्यांकडून महसुली...
राज्यात उन्हाचा चटका कायमपुणे   : कोरड्या व निरभ्र हवामानामुळे...
खानदेशात सूतगिरण्यांची वानवाजळगाव  ः खानदेशात कापूस हे प्रमुख पीक आहे....
दुष्काळ जाहीर करण्यासाठी मुहूर्त कशाला...औरंगाबाद  ः मराठवाड्यातील ७६ पैकी ५६ तालुक्‍...
सिंचन परिषदेतील विचार मंथनाची दिशा...सोयगाव, जि. औरंगाबाद   : केवळ चर्चा, प्रबोधन...
स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा...फळभाज्या तसेच फळांच्या वाढीसाठी स्फुरद हे...