Agriculture News in Marathi, sugar factories delared purchase price of sugarcane, Kolhapur district | Agrowon

कोल्हापुरातील कारखान्यांचा पहिला हप्ता तीन हजार रुपयांवर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017
कोल्हापूर : कारखानदार व शेतकरी संघटनांमध्ये ऊस दर प्रश्‍नी तोडगा निघाल्यानंतर सप्ताहाच्या आतच जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी पहिला हप्ता विनाकपात ३००० रुपये इतका जाहीर केला.
 
कोल्हापूर : कारखानदार व शेतकरी संघटनांमध्ये ऊस दर प्रश्‍नी तोडगा निघाल्यानंतर सप्ताहाच्या आतच जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी पहिला हप्ता विनाकपात ३००० रुपये इतका जाहीर केला.
 
बैठकीत एफआरपी अधिक १०० रुपये पहिला हप्ता व दोन महिन्यांनंतर शंभर रुपये कारखान्यांनी द्यावेत, असा समझोता झाला होता. पण अनेक कारखान्यांनी ‘एफअारपी’बरोबरच २०० रुपयेच एकाच वेळी दिले आहेत. यामुळे बैठकीत शंभर रुपये नंतर देण्याचे ठरूनही कारखान्यांनी ही रक्कम एकत्रच दिली आहे. कारखान्यांकडे पैसे द्यायची तयारी होती तर हप्ता जाहीर करायला टाळाटाळ का केली, असा सवाल आता उपस्थित होत आहे. 
 
जिल्ह्यातील साखर उतारा सरासरी ११ ते १३ एवढा अाहे. साखर उताऱ्यानुसार २७०० ते २९०० रुपयांपर्यंत एफआरपी दिली जाते. यामध्ये २०० रुपये जास्तीचे घालून पहिला हप्ता ३००० किंवा त्यापेक्षा २५ ते ५० रुपयांनी जास्त अशा बेताने आपल्या पहिल्या उचली जाहीर केल्या आहेत.
 
ज्यावेळी शेतकरी संघटनांची व कारखानदारांची बैठक झाली, त्यावेळी कारखानदारांतही दोन गट दिसले. काही कारखाने ३००० रुपयांपेक्षा जास्त दर देण्यास तयार होते. पण इतर कारखानदारांनी त्यांना विरोध करून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवले. तुम्ही तयार असला तरी ‘स्वामिभानी’ने दर मागितला म्हणून तो दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेला याचे श्रेय जाईल, या शक्‍यतेने कारखान्यांनी शक्‍य असतानाही कमी दरास मान्यता दिली.
 
‘स्वाभिमानी’ने कारखानदारांचा प्रस्ताव मान्य केल्यानंतर मागितलेल्या दरामुळे खूपच खाली येऊन संघटनेने तडजोड केली, असा आरोप संघटनेवर झाला. याच कालावधीत कारखान्यांनी ३००० व त्याही पेक्षा काही रक्कम जादा देत पहिला हप्ता जाहीर केला. आम्ही दर इतकाच देणार होतो. यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संबंधच काय? असा सवाल करीत कारखानदारांनी संघटनेला जादा दराचे श्रेय न देण्याचा प्रयत्न केला आहे.
 
स्पर्धेतून जादा दर 
अनेक कारखान्यांनी यंदाचा ऊस हंगाम पाहाता जादा दर देऊन ऊस उत्पादकांना आपल्याकडे खेचण्याचे नियोजन केले आहे. यामुळे पहिला हप्ता जरी ३००० रुपये जाहीर केला, तर जसा हंगाम पुढे सरकेल त्या प्रमाणात काही कारखाने उशिरा तुटलेल्या उसासही जादा दर देण्याचा विचार करीत असल्याची माहिती या उद्योगातील सूत्रांनी दिली.
 
हंगामाचा अंदाज घेऊन कारखाने पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी मातब्बर कारखाने टनास आणखी १०० रुपयांपर्यंत देण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. याचा फायदा प्रामुख्याने आडसाली उसाला होण्याची शक्‍यता आहे. जानेवारी, फेब्रुवारीत तुटणाऱ्या उसाला पहिला हप्ता किमान ३२०० रुपयांपर्यंत मिळण्याची शक्‍यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली.
टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...
कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपातनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील...
जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून '...पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन...
फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..! नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण...