agriculture news in marathi, Sugar factories demands 90 percent Advance loan | Agrowon

राज्य बॅंकेने ९० टक्के उचल द्यावी : साखर कारखाने
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 डिसेंबर 2017

कोल्हापूर : साखरेच्या घसरत्या दरामुळे कारखानदारी अडचणीत आली आहे. यातच राज्य बॅंकेनेही साखरेचे घसरलेले दर गृहीत धरून मूल्यांकन कमी केले आहे. परिणामी बॅंकेकडून मिळणाऱ्या उचलीतही घट झाली. बॅंकेकडून उचल कमी मिळाल्याने एफआरपीची रक्कम देताना उर्वरित रक्कम कुठून आणायची याची चिंता कारखानदारांना लागली आहे. राज्य बॅंकेकडून सध्या एका पोत्यावर ८५ टक्के उचल मिळते. ती ९० टक्के मिळावी, अशी मागणी कारखानदारांनी केली आहे.

कोल्हापूर : साखरेच्या घसरत्या दरामुळे कारखानदारी अडचणीत आली आहे. यातच राज्य बॅंकेनेही साखरेचे घसरलेले दर गृहीत धरून मूल्यांकन कमी केले आहे. परिणामी बॅंकेकडून मिळणाऱ्या उचलीतही घट झाली. बॅंकेकडून उचल कमी मिळाल्याने एफआरपीची रक्कम देताना उर्वरित रक्कम कुठून आणायची याची चिंता कारखानदारांना लागली आहे. राज्य बॅंकेकडून सध्या एका पोत्यावर ८५ टक्के उचल मिळते. ती ९० टक्के मिळावी, अशी मागणी कारखानदारांनी केली आहे.

जर उचलीच्या प्रमाणात वाढ झाली नाही, तर पंधरा दिवसांनी निघणारे बिल महिन्याने देण्याचा विचार काही कारखाने करत असल्याने आता या दर घसरणीच्या खेळात उत्पादकच भरडला जाण्याची शक्‍यता आहे. रकमेची जुळणीच होत नसेल, तर पंधरा दिवसांनी पहिला हप्ता देणार कसा? असा प्रश्‍न कारखानदारांचा आहे. 

साखरेच्या किमती गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत सुमारे चारशे रुपयांनी घसरल्या. हंगामाच्या प्रारंभी ३५०० रुपये असणारी साखर आता ३१०० वर येऊन ठेपली आहे. राज्य बॅंकेने जलदगतीने हालचाली करत मूल्यांकन कमी केले. यामुळे सध्या साखर कारखान्यांना पोत्याला इतर खर्च वजा जाता १८५० रुपये मिळत आहे. कारखान्यांनी ३००० च्या आसपास पहिला हप्ता जाहीर केला आहे. यामुळे कारखान्यांना टनामागे अकराशे ते बाराशे रुपयांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

इतर उत्पादनांतून मिळणारे उत्पन्न गृहीत धरूनही या रकमेची जुळवाजुळव करणे अशक्‍य होत असल्याचे कारखानदारांचे म्हणने आहे. सध्या १८५० रुपये कर्जरूपी उचल मिळते. यात बॅंकेने पाच टक्क्‍यांनी वाढ केल्यास २१०० रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकेल, असा अंदाज आहे. बॅंकेने काही तरी उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी कारखानदारांची आहे. 

राज्य बॅंक ऐकणार का?
सध्या राज्य बॅंकेवर प्रशासक मंडळ आहे. ज्या वेळी साखरेचे दर वाढत असतात, त्या वेळी महिन्याचा स्थिर दर लक्षात ठेवून बॅंक मूल्यांकन करते; पण ज्या वेळी दर घसरतात, त्या वेळी मात्र बॅंक तातडीने निचांकी दर गृहीत धरून साखरेचे मूल्य ठरविते. कारखानदारांनी जरी ९० टक्क्यांची मागणी केली तरी राज्य बॅंकेचे व्यवस्थापन उचल वाढवून देईल का? असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यांच्या गाळप क्षमतांचा विचार केल्यास एका कारखान्याचे पंधरवड्याचे बिल २० ते २२ कोटी रुपये इतके होते. प्राप्त परिस्थितीत इतकी रक्कम जमा करणे केवळ अशक्‍य बनत आहे. यामुळे पहिला हप्ता पंधरा दिवसांनी देण्याऐवजी थोडा उशिरा देण्याविषयी ही काही कारखाने विचार करत आहेत. 
- अरुण लाड, अध्यक्ष, क्रांती साखर कारखाना, कुंडल, जि. सांगली

इतर अॅग्रो विशेष
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...
उन्हाचा चटका पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : मागील आठवड्यात झालेला पूर्वमोसमी वादळी...
सूर्य तळपताना छत करा दुरुस्तआठवड्यापूर्वी आलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजाने...
आयोगाचा कारभार प्रश्‍नचिन्हांकितप्रत्येक निवडणुकीची रीत न्यारी असते,...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...